Jaya Ekadashi 2026 : जया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

Published:
जया एकादशीला विशेष महत्त्व आहे. जया एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते. जाणून घ्या जया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये.
Jaya Ekadashi 2026 : जया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हटले जाते. जया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घेऊयात…

जया एकादशीचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, जया एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतात. या एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते, ज्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. या व्रतामुळे माणसाला भूत-प्रेत योनी किंवा पिशाचांसारख्या कष्टांतून मुक्ती मिळते आणि पापांचा नाश होतो. जया एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. या दिवशी उपवास केल्याने अश्वमेध यज्ञ केल्यासारखे पुण्य मिळते.

जया एकादशीच्या दिवशी काय करावे ?

  • सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूची, लक्ष्मी मातेची पूजा करावी.
  • विष्णूजींच्या पूजेत तुळशी अर्पण करणे अनिवार्य आहे, कारण त्यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे।
  • उपवास कडक असावा, न शकल्यास फलाहार (फळे, दूध) घ्यावा.
  • दिवसभर “ॐ नमो भगवते वासुदेवाय” मंत्राचा जप करावा आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.
  • गरजूंना किंवा ब्राह्मणांना दान देणे पुण्यकारक मानले जाते.
  • दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर योग्य वेळेत (पारण) उपवास सोडावा.
  • हे व्रत अत्यंत पुण्यदायी असून यामुळे वैकुंठ प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.

जया एकादशीच्या दिवशी काय करू नये?

  • लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी, मद्य यांचे सेवन करू नका.
  • एकादशीच्या दिवशी दिवसा झोपल्याने उपवासाचे फळ मिळत नाही.
  • तुळशीला पाणी घालू नका किंवा तुळशीची पाने तोडू नका, कारण या दिवशी तुळशी निर्जला व्रत करते.
  • खोटे बोलू नका, कोणाबद्दल वाईट बोलू नका, मनात द्वेष किंवा ईर्ष्या ठेवू नका.
  • दाढी करणे, केस कापणे, नखे कापणे किंवा शरीराला तेल लावणे टाळावे.
  • एकादशीला तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत.
  • तुळशीच्या रोपाजवळ अस्वच्छता किंवा चप्पल ठेवू नका. 
  • कुणाशीही भांडण किंवा वाद घालू नये.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)