Jaya Ekadashi : कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व…

Published:
माघ शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. गुरुवारी एकादशी येत असल्याने या दिवशी विष्णूंची पूजा केल्यास कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो आणि प्रमोशन-पैशात लाभ होतो.
Jaya Ekadashi : कधी आहे जया एकादशी? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व…

हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जया एकादशी म्हणून ओळखले जाते. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, जया एकादशीच्या दिवशी विधीनुसार पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होण्यास मदत होते. चला तर मग जया एकादशी कधी आहे तसेच शुभ वेळ कोणती आहे हे जाणून घेऊयात…

कधी आहे जया एकादशी?

पंचांगानुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. आणि 29 जानेवारी रोजी 2026 पहाटे 1 वाजून 56 मिनिटांनी संपेल. एकादशीचे व्रत उदय तिथीनुसार गुरुवार, 29 जानेवारी 2026 रोजी केले जाईल.

पुजेचा मुहूर्त

जया एकादशीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून 11 मिनिट ते 8 वाजून 32 मिनिटांपर्यंत पूजेचा पहिला सर्वोत्तम वेळ आहे. यावेळी तुम्ही पूजा करू शकता. यानंतर सकाळी 11 वाजून 14 मिनिट ते दुपारी 1 वाजून 55 मिनिटांपर्यंत असेल. या वेळेतही तुम्ही विशेष पूजा करू शकता. एकादशीचे व्रत सोडण्यासाठी द्वादशी तिथीचा काळ महत्त्वाचा असतो. जया एकादशीचे पारण 30 जानेवारी 2026, शुक्रवारी सकाळी 07 वाजून10 मिनिट ते 09 वाजून 20 मिनिटांपर्यंत करणे सर्वात फलदायी ठरेल.

जया एकादशीचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार, जया एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यातील सर्व दुःखे दूर होतात. या एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते, ज्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. या व्रतामुळे माणसाला भूत-प्रेत योनी किंवा पिशाचांसारख्या कष्टांतून मुक्ती मिळते आणि पापांचा नाश होतो. जया एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात. या दिवशी उपवास केल्याने अश्वमेध यज्ञ केल्यासारखे पुण्य मिळते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews