वास्तुशास्त्रात तवा आणि कढई अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती थेट अन्नापूर्णा देवीशी संबंधित आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, रोज रात्री स्वयंपाक झाल्यावर तवा स्वच्छ धुवून त्यावर काही वस्तू सल्ला दिला जातो. हा उपाय सुख-समृद्धी वाढवण्यास मदत करतो असे मानले जाते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
तव्यावर ठेवा ‘या’ दोन वस्तू
वास्तुशास्त्रानुसार, आर्थिक समृद्धी आणि धनलाभासाठी दररोज रात्री स्वयंपाकघरातील शेगडीवर तवा ठेवून त्यावर एक तेजपत्ता आणि एक हिरवी इलायची ठेवणे शुभ मानले जाते. हा उपाय घरातील लक्ष्मीची कृपा वाढवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
उपाय कसा करावा?
- रात्री स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर शेगडी किंवा चुलीवर स्वच्छ तवा ठेवा.
- तव्यावर एक तेजपत्ता आणि त्यावर एक हिरवी वेलची (इलायची) ठेवा.
- दुसऱ्या दिवशीसकाळी उठल्यावर, तो तेजपत्ता आणि वेलची उचलून गॅसवर जाळून टाका आणि त्याची राख झाडाखाली टाकून द्या.
- हा उपाय केल्याने घरात पैशाची चणचण दूर होऊन आर्थिक स्थैर्य येते.
वास्तुशास्त्रानुसार तव्याचे नियम
- रात्री स्वयंपाक झाल्यावर तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा, घाणेरडा तवा ठेवल्यास गरिबी येते.
- तवा नेहमी स्वच्छ धुवूनच ठेवावा, उष्ट्या तव्यावर अन्न शिजवू नये.
- अनेक जण तवा उलटा ठेवतात, जे अशुभ मानले जाते. तवा सरळ ठेवावा.
- तवा उलटा किंवा उभा न ठेवता, नेहमी सरळ आणि शेगडीच्या उजव्या बाजूला ठेवावा
- तवा धुताना त्यावर काहीही (जसे की भात, पीठ) चिकटलेले नसावे.
- तवा आणि कढई कधीही एकमेकांवर ठेवू नयेत, यामुळे घरातील सुख-शांती नष्ट होते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





