Vastu Tips : कारमध्ये ठेवा ‘या’ गोष्टी, नकारात्मकता होईल दूर…

Published:
वास्तुशास्त्रानुसार, गणपती, कासव, स्फटिक यांसारख्या शुभ वस्तू ठेवणे आणि कार स्वच्छ ठेवणे हे सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
Vastu Tips : कारमध्ये ठेवा ‘या’ गोष्टी, नकारात्मकता होईल दूर…

वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहे. रोजच्या वापरातल्या गोष्टीबाबतही वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. काही गोष्टी सकारात्मक परिणाम करत असतात. वास्तुशास्त्र गाडीबाबतही सांगण्यात आलं आहे. आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची कार आहे. कार हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेली आहे. आज आपण कोणत्या वस्तू गाडीत ठेवल्या तर सकारात्मक उर्जा निर्माण करतात हे जाणून घेणार आहोत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

गणपतीची मूर्ती

विघ्नहर्ता गणपतीची छोटी मूर्ती ठेवल्यास प्रवासात अडथळे दूर होतात. अडथळे दूर करण्यासाठी आणि संकट निवारणासाठी गणपतीची छोटी मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

कासव

काळ्या रंगाचे कासव नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मकता वाढवते. काळ्या रंगाचे छोटे कासव ठेवणे लाभदायक ठरते, असे वास्तुशास्त्र सांगते. काळ्या रंगाची कासवाची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वाहनधारकाचे दीर्घायुष्य होते.

नैसर्गिक दगड/स्फटिक

क्रिस्टल किंवा नैसर्गिक दगड पृथ्वी तत्त्वाशी संबंध जोडतात आणि गाडी सुरक्षित ठेवण्यास मदत करतात. क्रिस्टल नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सकारात्मकतेचा संचार करतात.

मोरपंख

कारमध्ये मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यासाठी मोरपंख उपयोगी पडते.

पाण्याची बाटली

कारमध्ये एक छोटी पाण्याची बाटली ठेवणे मानले जाते, जे प्रवासात शांतता आणते. एक पाण्याची बाटली ठेवल्याने मन शांत राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

रॉक सॉल्ट (खडे मीठ)

सीटखाली खडे मीठ आणि बेकिंग सोडा ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. एका लाल कपड्यात खड्या मिठाची पुरचुंडी बांधून गाडीच्या सीटखाली ठेवा, किंवा वर्तमानपत्रावर ठेवून रोज बदला. हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)