Marathi News

Lord Hanuman Baby Names : हनुमानाच्या नावावरुन बाळांची ठेवा ‘ही’ युनिक नावं, मुलांसाठी ठरतील अतिशय खास

Published:
जर तुम्ही देखील हनुमानाचे भक्त असाल आणि हनुमानाच्या नावावरुन तुमच्या मुलाचं नाव शोधत असाल तर तुम्हाला हनुमानजींची 'ही' नावं नक्कीच आवडतील. जाणून घेऊयात...
Lord Hanuman Baby Names : हनुमानाच्या नावावरुन बाळांची ठेवा ‘ही’ युनिक नावं, मुलांसाठी ठरतील अतिशय खास

तुम्ही तुमच्या मुलांसाठी बजरंगबलीची अतिशय गोंडस नावं निवडू शकता. घरात नुकताच तान्ह्या बाळाचा जन्म झाला असेल तर तुम्ही ही नावं नक्कीच ठेवू शकता.

हनुमानाच्या नावावरुन बाळांची नावं

अतुलित : हनुमानाच्या या नावाचे वर्णन हनुमान चालीसेत केले आहे. अतुलित शब्दाचा अर्थ होतो की कोणतीही तुलना केली जाऊ शकत नाही

अभ्यंत : या शब्दाचा अर्थ आहे भीतीमुक्त असणे. धाडसी आणि निर्भयी असणारी व्यक्ती म्हणजे अभ्यंत होय.

रीतम : हनुमानासारखा पवित्र आणि सुंदर मनाचा. हनुमान हे खूपच निर्मळ अशा मनाचे होते.

रुद्रांक्ष : हनुमानाला भगवान शिवाचा अंश मानला जातो.

शौर्य : निर्भय, पराक्रमी, शूर असा या नावाचा अर्थ आहे.

तेजस : उज्वल, चमचमणारा.

अमित : या दोन्ही नावांचा अर्थ अमर्याद, अथांग असा आहे.

हनुमान : दैवी, देव असा या नावाचा अर्थ आहे.

अनिल : पवनपुत्र, वारा, शुद्ध.

संजू : विजयी,  हनुमानाच्या नावावरुन हे नाव ठेवू शकता.

बजरंगी : देवासाठी लढणारा सेनानी असा या नावाचा अर्थ आहे.

चिरंजीवी : अमर असा या नावाचा अर्थ आहे.

इराज : वारा-जन्, हे नाव युनिक आहे.

भक्तवत्सल : त्याच्या भक्तांचा रक्षक, या नावामधील तुम्ही फक्त ‘वत्सल’ हे नाव देखील निवडू शकता.

महावीर : सर्वात शूर असा.

महातेज : तेजस्वी एक, हे नाव युनिक आहे पण याचा अर्थ खास आहे.

ध्यानंजनेय : ध्यानाची मनस्थिती असा या युनिक नावाचा अर्थ आहे.

ज्ञानसागर : ज्ञानाचा सागर, हे पाच अक्षरी नाव अतिशय युनिक आहे.

जितेंद्रिय : ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला असा तो म्हणजे हनुमान.

वायुनंदन : वायुचा पुत्र, पवन देवता हे नाव अतिशय युनिक आहे.

कलानभ : जो वेळेवर नियंत्रण आणि व्यवस्था करू शकतो.

विश्वेश : सर्वोच्च अस्तित्व असा या नावाचा अर्थ आहे.

प्रतापवत : वैभव असा या नावाचा अर्थ आहे. ‘प्रताप’ असं देखील नाव निवडू शकता.

उर्जित : उर्जेने परिपूर्ण अर्थ असलेले ‘उर्जित’ हे नाव खास आहे.

केसरीनंदन : वडील केसरी यांचा मुलगा.

मारुती : पवनदेवता मारुतीचा मुलगा

अंजनेय : तुम्ही तुमच्या बाळाचे नाव अंजनेय ठेवू शकता. माता अंजनीचा पुत्र

कपेश्वर : वानरांचा राजा

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews