महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. असे म्हटले जाते की भगवान शिव अतिशय भोळे आहे, ते केवळ नि:स्वार्थ भक्तीने लगेच प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या पूजेत रंगांची विशेष काळजी घेतली जाते. या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो? तसेच या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी ?
महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करताना हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. हिरवा रंग शंकराचा आवडता आहे, कारण तो निसर्ग, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याव्यतिरिक्त पांढरा, लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते. भगवान शिवाला हिरवा रंग प्रिय असल्याने बेलपत्रासह हिरवे वस्त्र परिधान करणे उत्तम, तर पांढरा रंग शुद्धतेचे आणि लाल रंग भक्तीचे प्रतीक आहे. भगवान शिवाला प्रिय, कारण महादेवाला बेलपत्र, भांग आणि धोतरा अर्पण केले जाते, ज्यांचा रंग हिरवा आहे. पांढरा रंग हे पवित्रता आणि शांतीचे प्रतीक मानले जाते, जे शिवाला प्रिय आहे, तसेच हे रंगाचे कपडे घालून पूजा केल्यास मन शांत राहते. लाल रंग हा रंग भक्ती, ऊर्जा आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो, जो पूजेच्या वेळी परिधान करणे फलदायी ठरू शकते. पिवळे कपडे परिधान केल्याने जीवनात मानसिक शांती आणि आनंद मिळतो.
कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे?
हिंदू धर्मात काळ्या रंगाचा संबंध नकारात्मकता आणि शोक यांशी जोडला जातो, त्यामुळे कोणत्याही पवित्र पूजेमध्ये, विशेषतः महाशिवरात्रीला, काळे कपडे वापरू नयेत. या दिवशी काळा रंग परिधान करू नये. भगवान शंकरांना काळा रंग अजिबात आवडत नाही. हिंदू धर्मात काळ्या रंगाला नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे पूजा किंवा धार्मिक कार्यात हा रंग परिधान करणे टाळले पाहिजे. म्हणून, महिलांनी काळ्या रंगाच्या बांगड्या, कपडे किंवा टिकली न लावता साधे व स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करावी.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






