मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. भोगी म्हणजे ‘उपभोग घेणे’. या दिवशी विविध भाज्या, तीळ-गूळ, बाजरीची भाकरी खाऊन निसर्गाकडून मिळालेल्या सुबत्तेचा उपभोग घेतला जातो.अशा या सणाचा आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा…
भोगी सणाचे महत्व
भोगी म्हणजे ‘उपभोग घेणे’. या दिवशी विविध भाज्या, तीळ-गूळ, बाजरीची भाकरी खाऊन निसर्गाकडून मिळालेल्या सुबत्तेचा उपभोग घेतला जातो. हा सण नवीन सुरुवात आणि बदलाचे प्रतीक आहे. लोक जुन्या आणि निरुपयोगी वस्तू टाकून देतात आणि नवीन गोष्टींचे स्वागत करतात. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा हा सण रब्बी पिकांच्या कापणीशी संबंधित आहे, ज्यात शेतकरी निसर्गाचे आभार मानतात. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते (भोगी पोंगल) आणि घरातील जुन्या वस्तूंची शेकोटी पेटवून नवीन वर्षाची सुरुवात होते.
हे ही वाचा
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
दु: ख असावे तीळा सारखे,
आनंद असावा गुळासारखा,
तुमचे अवघे जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा !
मकर संक्रांतीचा पहिला सण
‘भोगी’ च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
मेव्याचा आस्वाद आपणास भरभरून लाभो,
आपले जीवन सदैव निरोगी रहावो.
भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
भोगीच्या भाजीची चव असते न्यारी,
सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी.
भोगी निमित्त तुम्हाला शुभेच्छा !
हिरवागार हरभरा
गुलाबी थंडी, लाल गाजर
तीळ अन् बाजरीची भाकर,
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा !
नव वर्षातील पहिला सण,
आनंद अन् उत्साह घेऊन येवो.
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा !
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आपणांस व आपल्या परिवाराला
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..
तिळाची उब लाभो तुम्हाला
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला
यशाची पतंग उड़ो गगना वरती.
तुम्हास अणि तुमच्या परिवारास
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!
“भोगीचा सण तुमच्या आयुष्यात नवी उमेद,
नवीन उत्साह आणि भरभरून आनंद घेऊन येवो
भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा!”
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)