Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही ‘या’ वस्तूंचे करू नका दान, अन्यथा….

Published:
मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि हा दिवस शनिदेवांचा असतो. त्यामुळे या दिवशी योग्य वस्तूंचे दान केल्याने त्यांची कृपा मिळते, तर चुकीच्या वस्तू दान केल्यास ते नाराज होऊ शकतात.
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही ‘या’ वस्तूंचे करू नका दान, अन्यथा….

मकर संक्रांत हा सण दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले दान 100 पटीने फळ देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मकर संक्रांतीला दान करताना वस्तूंची निवड काळजीपूर्वक करावी. नवीन, स्वच्छ आणि सात्विक वस्तूंचे दान केल्याने पुण्य मिळते, तर जुन्या आणि नकारात्मक वस्तूंच्या दानने विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही अशा वस्तू आहेत ज्यांचे दान केल्याने शनीदेव आणि सूर्यदेव नाराज होऊ शकतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

वापरलेले किंवा जुने कपडे

मकर संक्रांतीला ज्योतिषशास्त्रानुसार जुने, फाटलेले, मळलेले कपडे दान करणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरात गरिबी येते. त्याऐवजी नवीन किंवा चांगल्या स्थितीतील कपडे दान करावेत. नवीन किंवा चांगल्या स्थितीतले कपडे दान केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

वापरलेले तेल

मकर संक्रांतीला वापरलेले किंवा खरकटे तेल दान करू नये, कारण ते शनिदेवाचा अशुभ प्रभाव वाढवते. यामुळे शनिदेव संतप्त होतात, कामात अडथळे येतात आणि आरोग्याच्या समस्या वाढतात. तेल नेहमी ताजे आणि स्वच्छ असावे. तीळ आणि तेलाचे दान शुभ असले तरी, उरलेले किंवा घाणेरडे तेल दान केल्यास शनिदेवाचे अशुभ परिणाम होऊ शकतात.

प्लास्टिक आणि काचेच्या वस्तू

मकर संक्रांतीला ज्योतिषशास्त्रानुसार प्लास्टिक, काच, दान करणे टाळावे, कारण यामुळे घरात कलह, नकारात्मक ऊर्जा आणि शनिदेवाचा अशुभ प्रभाव येऊ शकतो. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, गरिबी येते आणि शनिदेव व राहू-केतूचा कोप होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबात कलह वाढतात. याउलट नवीन आणि चांगल्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होतो.

तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू

मकर संक्रांतीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार चाकू, कात्री, नखे यांसारख्या तीक्ष्ण किंवा धारदार वस्तूंचे दान करू नये, कारण यामुळे घरात कलह आणि नकारात्मकता येते.

काळ्या रंगाचे कपडे

मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे दान करू नये कारण तो रंग शुभ मानला जातो व तो परिधान केला जातो. या दिवशी काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि तो शुभ मानला जातो, त्यामुळे दान करू नये.

शिळे अन्न

शिळ्या अन्नाचे दान करणे वर्जित मानले जाते. दान नेहमी ताजे आणि सात्विक असावे.

तांदूळ

मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी (14 जानेवारी 2026) आल्याने, ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी तांदूळ किंवा तांदूळ-आधारित खिचडीचे दान टाळावे कारण एकादशीला तांदूळ वर्जित मानला जातो. त्याऐवजी, तुम्ही तीळ, गूळ, शेंगदाणे, कपडे, आणि सात्विक भोजन दान करू शकता किंवा तांदळाचे दान 15 जानेवारीनंतर करू शकता. जेणेकरून दानाचे पूर्ण फळ मिळेल आणि एकादशीच्या व्रताचे नियम पाळले जातील.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)