भारतीय संस्कृतीत एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि तिळाचे विशेष दान केले जाते. या दिवशी तिळाने स्नान करणे, तिळाचे दान करणे, तिळाचे हवन, तिळाचे तर्पण, तिळाचे भोजन आणि तिळाचे लाडू खाणे, असे सहा प्रकारे तिळाचा वापर केला जातो, म्हणून याला ‘षट्तिला’ एकादशी म्हणतात. काय आहे एकादशीची कथा जाणून घेऊया…
एकादशीची कथा
पौराणिक कथेनुसार, एका शहरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती. ती श्री हरी विष्णूची भक्त होती आणि नियमानुसार विष्णूचे सर्व व्रत पाळत असे. एकदा या ब्राह्मण महिलेने विष्णू पूजा करत महिनाभर व्रत केले. महिनाभर कडक उपवास केल्याने ब्राह्मण महिलेचे शरीर अशक्त झाले, परंतु या सोबत तिचे शरीर शुद्ध झाले. महिलेचे हे कठोर व्रत आणि भक्ती पाहून विष्णूला वाटले की, शरीर शुद्ध करून ही महिला वैकुंठाची प्राप्ती तर करू शकेल, पण तिचे मन तृप्त होणार नाही. कारण तिने उपवासात कोणतेही दान केले नव्हते. शास्त्रानुसार, दान केल्याशिवाय उपवासाचे पुण्य प्राप्त होत नाही. यामुळे या महिलेला विष्णुलोकात समाधान मिळणार नाही. त्यामुळे तिच्या पुण्याप्राप्तीसाठी स्वतः विष्णू दान घेण्यासाठी तिच्या घरी गेले.
श्री हरी विष्णू जेव्हा त्या ब्राह्मण महिलेच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले तेव्हा तिने दानात मातीचा एक गोळा दिला. हा मातीचा गोळा घेऊन श्री हरी विष्णू तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने ब्राह्मण महिलीचे निधन झाले. आणि ती थेट विष्णुलोकात पोहोचली. तिथे पोहचल्यानंतर तिला राहण्यासाठी एक झोपडी मिळाली, ज्यामध्ये आंब्याच्या झाडाशिवाय काहीही नव्हते. यावर ती म्हणाली इतके उपवास करून काय फायदा? वैकुंठात आल्यावरही हेच मिळाले. तेव्हा विष्णू म्हणाले की, तु मानवी जीवनात कधीही अन्न किंवा धन दान केले नाही आणि त्याचेच हे फळ आहे. हे ऐकून ती महिला पश्चाताप करू लागली आणि तिने यावर परमेश्वराकडे उपाय मागितला.
तेव्हा विष्णू म्हणाले की, जेव्हा देव कन्या तुला भेटायला येतील तेव्हा, त्यांना षट्तिला एकादशी व्रताती विधी आणि नियम विचारा. जोपर्यंत ते तुम्हाला व्रताची विधी सांगत नाहीत तोपर्यंत झोपडीचा दरवाजा उघडू नका. त्या ब्राह्मण महिलेने विष्णूने सांगितल्याप्रमाणे केले. आणि देव कन्यांकडून व्रताची विधी जाणून घेत विधीवत पद्धतीने व्रत देखील केले. षट्तिला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे तिची झोपडी सर्व आवश्यक वस्तू, पैसा, धान्य इत्यादींनी भरून गेली आणि ती वृद्ध महिला देखील सुंदर झाली. तर विष्णूंनी शट्तिला एकादशी व्रताचा महिमा नारदजींना सांगताना, लोकांनी अज्ञान सोडून षट्तिला एकादशीचे व्रत करावे. या एकादशीचे व्रत करणाऱ्याला प्रत्येक जन्मी आरोग्य प्राप्त होते. या व्रताने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. तसेच षट्तिला एकादशीच्या दिवशी तीळ दान केल्याने सौभाग्य वाढते आणि दारिद्र्य दूर होते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..