नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीला तीळाला खूप महत्त्व असते. या दिवशी तिळापासून अनेक पदार्थ बनवले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तीळ पापडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…
साहित्य
- तीळ
- गूळ (किंवा साखर)
- तूप
कृती
- तीळ चांगले भाजून घ्या.
- तीळ भाजून झाल्यावर ते प्लेटमध्ये काढून गार होऊ द्या.
- पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये गुळ घाला. गुळ सतत ढवळत राहा आणि पूर्णपणे वितळवून घ्या.
- गुळ वितळताना गॅसची फ्लेम मंद ठेवा, गुळाचा पाक तयार करा.
- गुळ पूर्ण वितळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घालून चांगलं मिक्स करा.
- पोळपाटावर तूप लावून गरम मिश्रण पातळ लाटा.
- अशा प्रकारे तुमची स्पेशल तीळ पापडी तयार होते.
टीप
- पापडी कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा पाक योग्य होणे महत्त्वाचे आहे. पाक कच्चा राहिल्यास पापडी मऊ पडते.
- या पदार्थात तीळ आणि गूळ उष्ण असल्याने थंडीत शरीराला ऊर्जा मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






