Makar Sankranti 2026 : सुगड पूजनाचा मुहूर्त काय ? जाणून घ्या सुगड पूजा पद्धत…

Published:
सुगड पूजा नवीन पीक घरात आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि निसर्गाप्रती कृतज्ञता (पृथ्वीमातेचे आभार) मानण्यासाठी केली जाते.  मकर संक्रांतीनिमित्त सुगड पूजनाचा शुभ मुहूर्त आणि पद्धत जाणून घ्या.
Makar Sankranti 2026 : सुगड पूजनाचा मुहूर्त काय ? जाणून घ्या सुगड पूजा पद्धत…

हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी सुवासिनींद्वारे सुगड पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा विधी मानला जातो. यंदा सुगड पूजन कसा आणि कधी करावा, चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

सुगड पूजन म्हणजे काय?

सुगड पूजन म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन धान्य, सुकामेवा आणि तिळगुळ यांनी भरलेल्या मातीच्या भांड्यांची (सुगडांची) पूजा करणे, जेणेकरून घरात समृद्धी आणि आनंद नांदेल. हे पूजन संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी केले जाते, ज्यात सुवासिनी महिला एकत्र येऊन पृथ्वीमातेचे आभार मानतात आणि एकमेकींना सुगड देतात. ‘सुगड’ हा शब्द ‘सुघट’ पासून आला आहे, म्हणजे चांगले घडणे किंवा सुसंवाद.  नवीन वर्षाची सुरुवात, निसर्गाप्रती कृतज्ञता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक.  हा सण नवीन पीक घरात आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पृथ्वीमातेचे आभार मानण्यासाठी साजरा करतात, जे समृद्धीचे प्रतीक आहे. 

सुगड पूजन मुहूर्त 2026

  • मकर संक्रांत तारीख : बुधवार 14 जानेवारी 2026
  • पुण्यकाळ : सकाळी 7 वाजून 15 मिनिट ते सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत (पूजेसाठी सर्वोत्तम वेळ).
  • महापुण्यकाळ : सकाळी 7 वाजून 15 मिनिट ते सकाळी 9.00 मिनिटांपर्यंत (या काळात पूजा करणे अत्यंत शुभ)

सुगड पूजन कसे करावे?

  • पूजेच्या आदल्या दिवशी मातीची सुगड स्वच्छ धुवून त्यांना वाळवून घ्या. त्यावर हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक किंवा उभ्या पाच रेषा काढाव्यात.
  • घरातील देवघरासमोर किंवा पवित्र जागी पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढून त्यावर तांदळाची रास ठेवावी. त्या राशीवर सुगडांची मांडणी करावी.
  • सुगडांमध्ये प्रथम तीळ-गुळ टाकावे. त्यानंतर त्यात हरभरा, बोरं, गाजर, ऊस आणि गव्हाच्या लोंब्या भराव्यात.
  • सर्व सुगडांना गंध, फुले आणि अक्षता वाहाव्यात. पांढरा कापूस किंवा दोरा (वस्त्र) प्रत्येक सुगडाला गुंडाळावा.
  • सुगडांना हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करा. धूप, दीप दाखवा. हे नवीन पीक घरात आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी केले जाते.
  • पूजेनंतर शेजारील सुवासिनींना घरी बोलावून त्यांना वाण दिले जाते. वाण देताना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हटले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)