नवीन वर्षातील पहिला आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा होता. पंतग, मांजा, तिळाचे लाडू, तिळ पोळीचा स्वाद घेतात. याच दिवशी एकमेंकाना तिळगुळ देऊन नात्यात गोडवा निर्माण केला जात असतो. त्यासाठी एकमेकांना तीळगुळ भरवला जातो. या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात असतात. आम्हीही तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश घेऊन आलोय. तुमच्या मित्रमंडळींना नक्की पाठवा….
मकर संक्रांतीचे महत्व
सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, त्यामुळे या सणाला ‘मकर संक्रांती’ म्हणतात. हा एक शेतीशी संबंधित सण आहे, जो नवीन धान्याच्या स्वागताचा असतो. तीळ आणि गूळ शरीरात उष्णता निर्माण करतात, जे हिवाळ्यातील हवामानासाठी फायदेशीर आहेत. हा सण निसर्गाच्या ऋतू बदलाचा उत्सव साजरा करतो. या दिवशी तीळ-गुळ वाटून, हळदी-कुंकू करून, सुगड पूजन करून आणि पतंग उडवून आनंद साजरा केला जातो. नवीन वस्त्रे परिधान केली जातात.
मकर संक्रांतीच्या द्या खास मराठीत शुभेच्छा…
पतंगाप्रमाणे उंच भरारी मारून
तुम्हीही तुमच्या स्वप्नांना घाला गवसणी.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
गोड गुळाला भेटला तीळ,
उडाले पतंग रमले जीव.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या
प्रियजनांना गोड गोड शुभेच्छा!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
तिळगुळाच्या गोडव्यासारखं
आपलं कुटुंब एकत्र राहो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोड नाती, गोड सण,
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड बोला!
तिळात मिसळला गूळ,
त्याचा केला लाडू,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तीळ आणि गूळ एकत्र येऊन जसा गोडवा निर्माण होतो,
तसाच हा सण आपल्या नात्यात गोडवा आणो
नव्या वर्षाच्या पहिल्या सणात
तुम्हाला आनंद, आरोग्य आणि समृद्धी लाभो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षाचा पहिला सण करा भरभरून साजरा,
तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा.
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
काळ्या साडीवर हलव्याचे दागिने
सजल्या नवविवाहित महिला
साजरी कराया संक्रांती
केला साजशृंगार भरला चुडा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
काळी भरजरी साडी
केसात माळला गजरा
कपाळी चंद्रकोर
गळ्यात मंगळसूत्र
संक्रांतीला वाण देण्यास
नटल्या सुवासिनी साऱ्या
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
संक्रांतीचा सण, दारी रांगोळी
खिसे भरले तिळगूळाने
तिळाच्या पोळीचा घमघमाट
सण साजरा करुया प्रेमाने
नात्यात भरुन मधुरता
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
संक्रांतीचा सण नात्यांचा
नात्यातील वीण घट्ट करण्याचा
रुसलेल्या नात्यांना मनवण्याचा
अविरत नाती जपण्याचा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मकर संक्रांतीचा सण आला
नात्यातील ऋणानुबंध
घट्ट करण्याचा दिन उजाडला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मैत्रीचे नात्यांचे बंध जपा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





