Wed, Dec 31, 2025

Vastu Tips : लिंबाचे करा ‘हे’ सोपे उपाय, अडकलेली कामे होतील पूर्ण

Published:
लिंबू वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते, ज्यामुळे घरात शांतता आणि सुख-समृद्धी येते. लिंबू सहज उपलब्ध असल्याने, हे उपाय करणे सोपे आहे आणि त्याचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे.
Vastu Tips : लिंबाचे करा ‘हे’ सोपे उपाय, अडकलेली कामे होतील पूर्ण

खूप मेहनत करूनही काहीतरी अडथळा येतो? जर असे असेल तर लिंबाशी संबंधित काही खास उपाय नक्की करून पाहा. वास्तुशास्त्रानुसार लिंबू नकारात्मक ऊर्जा दूर करते, वास्तुदोष कमी करते आणि अडलेली कामे पूर्ण करण्यास मदत करते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर करा

वास्तुशास्त्रानुसार, नोकरी-व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी रविवारी एक लिंबू घेऊन त्यात चार लवंगा खोचून ‘ओम श्री हनुमते नमः’ मंत्राचा २१ वेळा जप करावा आणि ते लिंबू कामाच्या ठिकाणी ठेवावे, ज्यामुळे अडथळे दूर होऊन प्रगती होते. हे लिंबू तुमच्याजवळ ठेवा किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते.

नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी

घरात लिंबाचे रोप लावल्याने किंवा एका भांड्यात लिंबू आणि पाणी ठेवून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. लिंबामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक ऊर्जा देण्याची शक्ती असते, असे मानले जाते.

पाणी आणि लिंबाचा उपाय

एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक लिंबू टाका आणि तो ग्लास घराच्या दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते.

घरातील कोपऱ्यांसाठी

एक लिंबू घ्या आणि ते घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये स्पर्श करून चार तुकड्यांमध्ये कापून घराबाहेर फेकून द्या (किंवा कचऱ्याच्या डब्यात टाका). यामुळे घरातील आणि आजूबाजूची नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक बदल जाणवतात.

झोपेशी संबंधित उपाय

अपुऱ्या झोपेचे कारण नकारात्मक ऊर्जा असू शकते. लिंबाच्या उपायांनी ही ऊर्जा दूर करून शांत झोप मिळण्यास मदत होते, असे म्हटले जाते. झोप येत नसेल तर उशीखाली हिरवे लिंबू ठेवा. ते सुकल्यावर काढून टाका आणि त्याजागी दुसरे ठेवा. यामुळे भीती दूर होते, असे मानतात. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)