Astro Tips : केसांना तेल कोणत्या दिवशी लावावे? वाचा शास्त्र काय सांगत…

Published:
केसांना तेल लावताना सोमवार, बुधवार आणि शनिवार निवडा, तर रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार टाळा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात अडथळे येणार नाहीत आणि तुम्हाला धन, आरोग्य व आनंद मिळेल, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
Astro Tips : केसांना तेल कोणत्या दिवशी लावावे? वाचा शास्त्र काय सांगत…

हिंद धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते. केसांना तेल लावल्यामुळे आरोग्य चांगले राहतेच, शिवाय केसांची वाढ देखील निरोगी होते. पण ज्योतिषशास्त्रानुसार, दररोज डोक्यावर आणि शरीरावर तेल लावणे फायदेशीर मानले जात नाही. आठवड्यातील काही विशिष्ट दिवशी तेल लावल्याने आयुष्यात हळूहळू अडचणी येऊ लागतात. आपण कोणत्या दिवशी डोक्याला तेल लावावे आणि कोणत्या दिवशी लावू नये चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

डोक्याला तेल कोणत्या दिवशी लावावे?

वास्तुशास्त्रानुसार, डोक्याला तेल लावण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शनिवार हे दिवस उत्तम आहेत, ज्यात शनिवार शनिदेवाला समर्पित असल्याने तेल लावल्याने यश मिळते. तर रविवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी तेल लावणे टाळावे, कारण या दिवसांत तेल लावल्याने आरोग्य आणि संपत्तीवर नकारात्मक परिणाम होतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते.

अशुभ दिवस

रविवारी

रविवारी डोक्यावर आणि शरीरावर तेल लावू नये. रविवार सूर्यदेवाला समर्पित असल्याने या दिवशी तेल लावल्यास शरीराचे तापमान वाढू शकते आणि शारीरिक व मानसिक संतुलन बिघडू शकते.

मंगळवार

मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने या दिवशी तेल लावणे अशुभ मानले जाते आणि यामुळे आयुष्यात अडथळे येऊ शकतात. मंगळाशी संबंधित संघर्ष, नकारात्मकता किंवा शारीरिक समस्या आणू शकतो.

गुरुवार

गुरु (बृहस्पति) ग्रहाशी संबंधित; आर्थिक नुकसान किंवा पैशांच्या समस्या देऊ शकतो, या दिवशी तेल लावल्यास धन आणि कर्जाची समस्या वाढू शकते, असे सांगितले जाते.

शुक्रवार

शुक्राशी संबंधित; वैवाहिक जीवनात किंवा कामात अडथळे व वेदना आणू शकतो, या दिवशी तेल लावणे टाळावे, कारण यामुळे आर्थिक समस्या वाढू शकतात आणि नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. 

शुभ दिवस

सोमवार

सोमवार या दिवशी तेल लावल्याने आरोग्य सुधारते आणि सौंदर्य वाढते. मानसिक शांती, सौंदर्य आणि चैतन्य वाढवते. सोमवार चंद्राशी संबंधित, मानसिक शांतीसाठी चांगला.

बुधवार

बुधवार बुध ग्रहाशी संबंधित, बुद्धी आणि समृद्धीसाठी उत्तम. हा दिवस धन, बुद्धी आणि व्यवसायासाठी शुभ मानला जातो.

शनिवार

शनिदेव यांना समर्पित असल्याने या दिवशी तेल लावल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि आरोग्य लाभते. शनिदेवाशी संबंधित, धन आणि बुद्धीसाठी फायदेशीर मानला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)