वास्तूशास्त्रात देव देवतांच्या उपासनेपासून दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. वैवाहिक जीवनातील आनंद आणि सुख हे खूप महत्त्वाच असतं. त्यामुळे शास्त्रात नवरा बायकोसाठीही काही नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत याबद्दलही सांगण्यात आलंय. चुकीच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवल्यास आयुष्यात अनेक वाईट परिणाम होतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवू नये

शास्त्रानुसार, नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये, विशेषतः पहिल्या आणि शेवटच्या दिवशी, शारीरिक संबंध ठेवणे टाळावे, कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी आणि भक्तीसाठी पवित्र मानले जातात. असे संबंध ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या पवित्र दिवसांमध्ये संबंध ठेवल्यास जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये

शास्त्रांनुसार, अमावस्येच्या दिवशी पती-पत्नीने शारीरिक संबंध चुकूनही ठेवू नयेत. शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी आपल्या आजूबाजूला नकारात्मक शक्तीचा वास असतो. नकारात्मक ऊर्जा प्रभावी असते, ज्यामुळे वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

संक्रांतीच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नये

शास्त्रानुसार, संक्रांतीच्या दिवशी पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, कुंडलीतील ग्रह कमजोर होऊ शकतात आणि जीवनात अशुभ परिणाम होऊ शकतात. या दिवशी वातावरणात नकारात्मक शक्तींचा प्रभाव असू शकतो, ज्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. संक्रांतीच्या दिवशी दान, स्नान, जप यांसारख्या धार्मिक कार्यांना महत्त्व दिले जाते, त्यामुळे शारीरिक संबंध टाळणे योग्य मानले जाते.

पितृपक्षात शारीरिक संबंध ठेवू नये

पितृपक्षात कधीही शारीरिक संबंध ठेवू नयेत. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि श्राद्ध विधींच्या काळात हे पंधरा दिवस शरीर व मन शुद्ध ठेवणे आवश्यक मानले जाते, म्हणून या काळात संबंध ठेवणे टाळावे.

एकादशी व चतुर्दशी शारीरिक संबंध ठेवू नये

एकादशी व चतुर्दशी  या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे अशुभ मानले जाते. कारण यामुळे वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकते. या दिवशी ब्रह्मचर्य पाळल्यास मान-सन्मान, सुख आणि आरोग्य चांगले राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)