Paush Purnima 2026 : पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा…

Published:
पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म करणे उत्तम मानले जाते. पण पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका. याबद्दल जाणून घेऊयात... 
Paush Purnima 2026 : पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा…
हिंदू पंचांगानुसार, पौष महिना हा पुण्य, आध्यात्मिक साधना आणि दानधर्मासाठी विशेष काळ मानला जातो. या महिन्यातील पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दानधर्म केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का की, या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करु नयेत. याबद्दल जाणून घेऊयात…

पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात ?

  • सकाळी लवकर उठून पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरीच गंगाजल टाकून स्नान करणे शुभ मानले जाते.
  • या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. श्रीसूक्ताचे पठण केल्यास विशेष लाभ होतो.
  • सत्यनारायण कथा श्रवण करावी आणि पूजा करावी.
  • पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवतेला दुधाने अर्घ्य द्यावे आणि दिवा लावावा.
  • गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे.
  • या महिन्यात सूर्यदेवाला अर्घ्य देणे महत्त्वाचे मानले जाते.

पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करु नयेत?

  • पौष पौर्णिमेच्या दिवशी उशिरा झोपू नये. सकाळी लवकर उठून भगवान विष्णूची पूजा करावी.
  • पौष पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मासांहार आणि मद्य सेवन करू नये. मांस, अंडी, कांदा, लसूण यांसारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत.
  • पौष पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. कारण तुळशीला भगवान विष्णूला सर्वात प्रिय मानले जाते. या दिवशी काळे कपडे परिधान करू नयेत.
  • पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द वापरू नयेत.
  • घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा किंवा कोणाचाही अनादर करू नका आणि क्रोध टाळा.
  • घरामध्ये स्वच्छता ठेवा, अस्वच्छता टाळा. 
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)