पौष महिना हा मार्गशीर्ष महिन्यानंतर येतो, ज्यात अनेक धार्मिक विधी केले जातात. पौर्णिमेला केलेला हा विधी अधिक प्रभावी ठरतो. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांमुळे जीवन सुखमय आणि समृद्ध होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते आणि सर्व पापे धुऊन जातात, अशी श्रद्धा आहे.
विष्णू सहस्रनाम पठण
पौष पौर्णिमेला पवित्र स्नान, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि बाधा दूर होतात. विष्णू सहस्रनाम पठण भगवान विष्णूची स्तुती करणारे हे स्तोत्र पठण केल्याने आरोग्य, धन आणि शांती मिळते. विष्णू सहस्रनाम हे पठण तणाव, चिंता आणि भीती कमी करते, तसेच आंतरिक संतुलन वाढवते. जीवनातील मोठी संकटे आणि अडचणी दूर करण्यासाठी हे स्तोत्र प्रभावी मानले जाते. यामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते आणि सकारात्मकता येते.
सूर्य अर्घ्य
उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करणे आणि ‘ॐ घृणिम सूर्य आदित्यमु’ या मंत्राचा जप करणे लाभदायक असते, ज्यामुळे ऊर्जा आणि तेज प्राप्त होते. सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे अधिपती असल्याने त्यांना अर्घ्य दिल्याने ग्रहदोष शांत होतात आणि ज्योतिषीय समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. सूर्यदेवाला अर्घ्य देणे हे आरोग्य, तेज आणि सकारात्मक ऊर्जेसाठी महत्त्वाचे मानले जाते.
या दिवशी काय करावे
- सकाळी लवकर उठून स्नान करावे.
- स्वच्छ वस्त्र परिधान करून विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
- भगवान विष्णूची पूजा करावी.
- सूर्याला तांब्याच्या कलशाने जल अर्पण करून “ॐ नमो भगवते वासुदेवाय” किंवा सूर्य मंत्राचा जप करावा.
सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत
- सूर्योदय होताना किंवा सूर्य उगवल्यानंतर लगेच (सकाळच्या वेळी) अर्घ्य द्यावे, दुपारनंतर टाळावे.
- तांब्याचे किंवा पितळेचे भांडे वापरावे.
- पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे.
- अर्घ्य देताना ‘ॐ घृणि सूर्याय नमः’ किंवा ‘ॐ सूर्याय नमः’, ‘ॐ आदित्याय नमः’, ‘ॐ भास्कराय नमः’ यांसारखे मंत्र म्हणावेत.
- पाणी हळू हळू पडू द्यावे, जणू काही ते सूर्याच्या किरणांच्या रूपात अर्पण होत आहे.
- अर्घ्य दिल्यानंतर स्वतःभोवती गोल फिरून (प्रदक्षिणा घालून) उठावे.
- जल अर्पण झाल्यावर तांब्याच्या भांड्यातील एक थेंब कपाळावर लावावा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





