Paush Purnima 2026 : पौष पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची पद्धत

Published:
पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पुजा केली जाते. असे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया पौष महिन्याची पौर्णिमा तिथी आणि पूजा पद्धत..
Paush Purnima 2026 :  पौष पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि पूजेची पद्धत

हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यावर्षी पौष पौर्णिमा कधी आहे? काय आहे पौष पौर्णिमेच महत्व जाणून घेऊयात…

कधी आहे पौष पौर्णिमा ?

हिंदू पंचांगानुसार, पौष पौर्णिमा तिथी 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी सुरु होईल. 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, पौष पौर्णिमेचे व्रत 3 जानेवारी 2026, रोजी साजरी केली जाईल.

पौष पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

पौष पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अक्षय पुण्य मिळते आणि पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. या दिवशी गंगा, यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मा-जन्माची पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. घरी स्नान करताना पाण्यात गंगेजल मिसळले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या पौर्णिमेला शाकंभरी देवीची पूजा केली जाते, जी अन्नदात्री देवी म्हणून ओळखली जाते. पौष पौर्णिमेपासून माघ महिन्यातील पवित्र स्नानाची सुरुवात होते, जे अत्यंत फलदायी मानले जाते. पौष महिना सूर्यदेवाला समर्पित असल्याने, पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र देवतेची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. पौष पौर्णिमेपासून माघ महिन्याची सुरुवात होते, जो आध्यात्मिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. या काळात प्रयागराजच्या संगमावर कल्पवास केला जातो.

पूजेची पद्धत

  • ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करा. शक्य नसल्यास, पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करा.
  • स्नानानंतर सूर्यमंत्राचा जप करत सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
  • भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. त्यांना नैवेद्य दाखवा.
  • या दिवशी सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते.
  • भगवान सत्यनारायणाची विधिवत पूजा करून फुले, फळे, मिठाई, पंचामृत आणि नैवेद्य अर्पण करा.
  • यानंतर भगवान सत्यनारायणाची कथा ऐका किंवा वाचा.
  • गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य दान करा. या दिवशी केलेले दान अनेक पटीने फळ देते, अशी श्रद्धा आहे. पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते.
  • या दिवशी उपवास केला जातो आणि जप-तप केले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews