Paush Purnima 2026 : पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात? जाणून घ्या..

Published:
हिंदू पंचांगानुसार, पौष महिना हा पुण्य, आध्यात्मिक साधना आणि दानधर्मासाठी विशेष काळ मानला जातो. या महिन्यातील पौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे.
Paush Purnima 2026 : पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात? जाणून घ्या..

हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. पौष महिन्याची पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा असते. यामुळेच या पोर्णिमेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पुजा केली जाते. असे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्या जाणून घेऊयात..

पौष पौर्णिमेचे महत्त्व

पौष पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात आणि मन शुद्ध होते, असे मानले जाते. यामुळे आध्यात्मिक प्रगती होते. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. ही पौर्णिमा विशेषतः लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी दानधर्म केल्याने पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो.

पौष पौर्णिमा हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी एक पवित्र दिवस आहे, ज्या दिवशी पवित्र स्नान, दान आणि व्रत केल्याने आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक शक्ती मिळते; या दिवशी फळे, मिठाई आणि नैवेद्य अर्पण करून सत्यनारायण पूजा आणि कथा वाचणे महत्त्वाचे मानले जाते, तसेच गरजूंना मदत केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते.

पौष पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्या

अन्नदान

गरजू आणि गरिबांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान करणे खूप पुण्यवान मानले जाते, ज्यामुळे अश्वमेध यज्ञाएवढे फळ मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. 

पांढऱ्या वस्तू

पांढरे तीळ, पांढरी मिठाई (साखर, खडीसाखर), तांदूळ, ब्लँकेट (रजई) दान करणे फलदायी ठरते. पांढरे तीळ हे आरोग्य, विशेषतः हाडे, त्वचा आणि पचनसंस्थेसाठी चांगले मानले जातात आणि दान केल्याने शुभ फळ मिळते. पांढरी मिठाई हे सुख-समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे, दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. तांदूळ हे अन्न आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

फळे आणि मिठाई

भगवान विष्णूला नैवेद्य दाखवून फळे आणि मिठाई वाटणे. शुद्ध तूप आणि लाडू, बर्फी यांसारख्या मिठाईचे दान केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते, घरात धन-वैभव येते आणि नात्यांमध्ये गोडवा वाढतो.

गायींना चारा

गायींना चारा देणे (गौ-दान) हे अत्यंत पवित्र मानले जाते. पौष पौर्णिमेच्या दिवशी गायींना चारा देणे (गौ-दान), तीळ, गूळ, तूप, मिठाई यांसारख्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते, शनि दोष दूर होतात आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

वस्त्रदान

थंडीच्या दिवसात गरजू लोकांना ब्लँकेट दान करणे हे आरोग्याच्या आणि दानाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जाते. थंडीचा काळ असल्याने गरजू लोकांना गरम कपडे, ब्लँकेट दान केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

तीळ आणि गूळ

तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि सूर्यदेव व शनिदेव प्रसन्न होतात, तर गुळाच्या दानाने कामे पूर्ण होतात. पौष महिन्यात थंडी असल्याने गूळ, तीळ यांसारख्या उष्ण पदार्थांचे दान करणे फायदेशीर ठरते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews