आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते, तर काही लहान मुलं मज्जा म्हणून गरम तव्यावर पाणी टाकतात. खरंतर गरम तव्यावर पाणी टाकल्याने ते पाणी तडतडू लागतं, जे बऱ्याच लोकांना पाहायला खूप आवडतं. पण गरम तव्यावर पाणी ओतू नये, असे म्हणतात. मान्यतेनुसार आपल्या स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणूनच प्राचीन काळापासून स्वयंपाकघरात काही गोष्टी करणं चुकीचं मानलं जात चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
गरम तव्यावर पाणी का टाकू नये?
वास्तुशास्त्रानुसार, गरम तव्यावर पाणी ओतणे अशुभ मानले जाते कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. लक्ष्मीचा वास असलेल्या स्वयंपाकघरात यामुळे धनाची हानी होऊ शकते आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यावर, विशेषतः मानसिक शांततेवर परिणाम होतो, म्हणून स्वयंपाकघरात ही चूक टाळणे महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांना अचानक आजारपण येऊ शकते किंवा घरात संकट येऊ शकते, अशी मान्यता आहे.
नकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार, तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यावर येणारा ‘चर्रर्र’ आवाज घरात नकारात्मक ऊर्जा आणतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, आजारपण येऊ शकते. यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, असे वास्तुशास्त्र सांगते.
राहु-चंद्र दोष
तव्याचा संबंध राहुशी आणि पाण्याचा संबंध चंद्राशी असतो. गरम तव्यावर पाणी टाकल्याने कुंडलीतील राहु आणि चंद्र कमजोर होतात, ज्यामुळे जीवनात संकट येऊ शकतात. तवा अग्नीचे प्रतिनिधित्व करतो, तर पाणी जल. त्यांचे हे असंतुलन घरात समस्या निर्माण करते, असे मानले जाते. यामुळे राहू आणि चंद्र यांच्यावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे घरात समस्या निर्माण होऊ शकतात.
माता लक्ष्मीची अवकृपा
गरम तव्यावर पाणी टाकल्याने लक्ष्मी नाराज होते आणि घरातून धन-समृद्धी बाहेर जाते, ज्यामुळे आर्थिक अडचणी येतात. तव्यावर पाणी टाकल्यावर येणारा आवाज अशुभ मानला जातो आणि त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. स्वयंपाकघरात देवी लक्ष्मीचा वास असतो. गरम तव्यावर पाणी टाकणे हे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे मानले जाते, ज्यामुळे घरातून लक्ष्मी निघून जाते.





