Rath Saptami 2026 : रथसप्तमी विशेष गोड भात अगदी सोप्या पद्धतीने, वाचा रेसिपी…

Published:
रथसप्तमीला सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी अंगणात मातीच्या पात्रात गाईच्या दुधात तांदूळ, गूळ आणि सुका मेवा घालून खिरीसारखा गोड भात (दुधभाताचा नैवेद्य) बनवला जातो. हा पारंपारिक नैवेद्य आरोग्यदायी असून, उत्तरायणात सूर्यपूजेनंतर अर्पण केला जातो.
Rath Saptami 2026 : रथसप्तमी विशेष गोड भात अगदी सोप्या पद्धतीने, वाचा रेसिपी…
माघ महिन्यातील रथसप्तमी (२५ जानेवारी २०२६) हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो, त्यामुळे हा गोड पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे.रथसप्तमीला सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गुळाचा गोड भात (किंवा तांदळाची खीर) नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची परंपरा आहे. हा नैवेद्य तयार करण्यासाठी नवीन तांदूळ, गूळ, दूध, वेलची आणि सुकामेवा वापरला जातो. चला तर मग हा पदार्थ कसा बनवायचा हे पाहुयात…

साहित्य

  • कप तांदूळ
  • दूध
  • गूळ (आवडीनुसार)
  • वेलची पूड
  • सुका मेवा (बदाम, काजू, चारोळी), केशर.

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे भिजत ठेवावेत.
  • दुध गरम करायला ठेवावे, त्यात भिजवलेला तांदूळ घालून मंद आचेवर मऊ शिजवावा.
  • भातातील सर्व दूध आटून भात शिजल्यावर त्यात गूळ आणि वेलची पूड घालावी.
  • गूळ वितळल्यावर सुका मेवा घालावा आणि नैवेद्य तयार करावा. 
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)