दरवर्षी, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते, जी सूर्य देवाला समर्पित आहे. रथसप्तमी हा प्रकाशाच्या देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी सूर्याची पूजा करण्याचा दिवस आहे.
रथसप्तमीचे महत्त्व
रथसप्तमी या सणाला ‘आरोग्य सप्तमी’ असेही म्हणतात. या दिवशी सूर्याची उपासना केल्याने त्वचेचे विकार दूर होतात आणि तेज-ऊर्जा मिळते. सूर्य आता दक्षिणायन सोडून उत्तरेकडे मार्गक्रमण करत असल्याने, हिवाळा कमी होऊन उष्णता वाढू लागते. सूर्य हा आरोग्याचा देवता मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्वचारोग दूर होऊन उत्तम आरोग्य लाभते. रथसप्तमीपासून सूर्य आपली दिशा बदलून उत्तरायणात अधिक प्रखर होतो, ज्यामुळे उबदारपणा वाढतो आणि अंधारातून प्रकाशाकडे संक्रमण होते. या दिवशी सात लाल फुले, चंदन आणि कापूर अर्पण करून तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य देणे शुभ मानले जाते
‘रथसप्तमी’ हा सूर्यदेवाचा जन्मदिवस
रथसप्तमीचा इतिहास
पौराणिक कथेनुसार, स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळेल? “म्हणून त्यांनी देवाला विचारले.” तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले, त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. याचा अर्थ ‘सात घोड्यांचा रथ’ असा होतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






