रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजेचे विशेष महत्त्व असून, या दिवशी केलेली पूजा आरोग्यवर्धक मानली जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यापूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.
रथसप्तमीला दूध उतू का घालावे ?
रथसप्तमी हे व्रत प्रामुख्याने सूर्यदेवाचे आहे. दूध उतू घालणे हे सूर्याची ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे आरोग्य उत्तम राहते. दूध ऊतू जाणे हे घरातील सुख, संपत्ती आणि अन्नात वृद्धी होण्याचे संकेत मानले जाते. रथसप्तमीला सूर्यरथाला लागणारी बारा चाके म्हणजे बारा राशी, तर सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात. या दिवशी सूर्यदेवाला अग्नीच्या रूपात दूध अर्पण केले जाते.
रथसप्तमी व्रताचे महत्त्व
रथसप्तमीला ‘सूर्य जयंती’ म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाने आपली किरणे पूर्ण क्षमतेने पृथ्वीवर पसरवली होती. या दिवशी व्रत केल्याने निरोगी आयुष्य, रोगमुक्ती, आणि दरिद्र्यनाश होतो. या दिवशी केलेले दान आणि पूजा विशेष फलदायी ठरते.
दूध कसे ऊतू घालवावे?
- पहाटे लवकर उठून आंघोळ करावी.
- अंगणात चौरस किंवा गोलाकार रथाचे चित्र काढावे.
- रथाच्या चित्राची पूजा करावी.
- मातीच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात कच्चे दूध घेऊन ते चुलीवर किंवा शेणाच्या उपऱ्यांवर उकळावे.
- दूध उकळल्यावर ते सर्व बाजूंनी, विशेषतः पूर्व दिशेला (सूर्याची दिशा) ऊतू जाईल, याची काळजी घ्यावी.
- दुधातील चमचा-चमचा भर दूध घरातील सर्वांना प्रसद म्हणून द्या.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






