Vastu Tips : कापूरच्या ‘या’ उपायांनी वास्तू दोष होईल दूर, घरात नांदेल सुख-समृद्धी

Published:
वास्तुशास्त्रानुसार कापूर वापरल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, वातावरण शुद्ध होते, आनंद आणि समृद्धी येते. पूजेत कापूर जाळल्याने सकारात्मकता वाढते.
Vastu Tips :  कापूरच्या ‘या’ उपायांनी वास्तू दोष होईल दूर, घरात नांदेल सुख-समृद्धी

आपल्या हिंदू धर्मात कापूराला खूप महत्त्व आहे. तसेच कापूराचे इतरही अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रानुसार, कापूर फक्त पूजेसाठीच उपयुक्त नाही तर घरातील दोष दूर करण्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे. वास्तुशास्त्रात कापराचे काही खास उपाय सांगितले आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

वास्तुदोष दूर करण्यासाठी

घरातील कोणत्याही वास्तुदोषासाठी, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूरच्या वड्या ठेवा. त्या विरघळल्यावर नवीन ठेवा, यामुळे वास्तुदोष कमी होतात आणि शांतता येते. मुख्य दरवाजा किंवा बाथरूमची दिशा वास्तुप्रमाणे नसेल तर त्या ठिकाणी कापूरच्या गोळ्या ठेवल्याने वास्तुदोष कमी होतो.

नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे

घरात कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध होते, नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात सकारात्मकतेचा वास पसरतो. सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळून आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात.

आर्थिक समृद्धी

कापूरचा सुगंध घरातील आर्थिक अडचणी दूर करतो आणि संपत्ती वाढवतो. तिजोरीजवळ किंवा मुख्य दरवाज्यावर कापूर ठेवणे फायदेशीर मानले जाते. शुक्रवारी गुलाबाच्या फुलात कापूर ठेवून जाळा आणि ते फूल मंदिरात अर्पण करा; यामुळे आर्थिक लाभ होतो. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि पैसा टिकवण्यासाठी खिशात कापूर ठेवा.

वाईट नजरेपासून संरक्षण

वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी कापूर उत्तम आहे. त्यात लवंग मिसळून जाळल्यास त्याची शक्ती वाढते. वाईट नजरेने ग्रासलेल्या व्यक्तीभोवती कापूर फिरवून तो जाळल्यास नजर उतरते, असे मानले जाते. 

मनःशांती

बेडरूममध्ये उशीखाली कापूर ठेवल्याने मनःशांती मिळते आणि घरातील भांडणे कमी होतात. घरात वारंवार भांडणे होत असल्यास, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवावा. बेडरूममध्ये उशीखाली कापूर ठेवल्याने मनःशांती मिळते आणि झोप चांगली लागते, ज्यामुळे घरातील कलह कमी होतो. तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने घरातील कलह कमी होतात आणि सदस्यांमध्ये सामंजस्य वाढते. 

ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करणे

ग्रहदोषामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी कापूर जाळणे प्रभावी आहे, असे मानले जाते. शनि, राहू किंवा इतर ग्रहांच्या वाईट प्रभावामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी कापूर जाळणे फायदेशीर ठरते, असे ज्योतिष शास्त्र सांगते.

आरती आणि पूजा

आरती आणि पूजेमध्ये कापूर वापरल्याने घर प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या उपायांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते, असे मानले जाते.

कसा वापर करावा

  • सकाळ-संध्याकाळ आरती करताना कापूर जाळा.
  • घरातील प्रत्येक कोपऱ्यात आणि बेडरूममध्ये कापूर ठेवा.
  • मुख्य प्रवेशद्वारावर कापूर ठेवल्याने घरातील दोष दूर होतात.
  • पैशांची चणचण असल्यास खिशात कापूर ठेवल्याने पैसा टिकून राहतो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)