Sat, Dec 27, 2025

Shakambhari Navratra : शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? जाणून घ्या पूजा पद्धत…

Published:
पौष महिन्यात येणार्‍या पौर्णिमाला शाकंभरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी शाकंभरी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते.
Shakambhari Navratra : शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? जाणून घ्या पूजा पद्धत…

शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे पौष महिन्यात साजरा होणारा एक विशेष नवरात्रोत्सव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, शाकंबरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीपासून होते आणि पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होते. ज्यात दुर्गा देवीच्या शाकंभरी स्वरूपाची पूजा केली जाते, जी वनस्पती, फळे आणि भाज्यांची देवी मानली जाते.

शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व 

शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत साजरा होणारा, देवी शाकंभरीला (पोषण आणि अन्नदानाची देवी) समर्पित एक विशेष उत्सव आहे, ज्यात भाज्या, फळे आणि पानांचा नैवेद्य दाखवून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते; शाकंभरी पौर्णिमेला या उत्सवाची सांगता होते, जिथे अन्न-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आणि विविध विधी, पूजा व दान-पुण्य केले जाते.

शाकंभरी पौर्णिमा पूजा पद्धत

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत.
  • पूजा स्थळ स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.
  • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करावी.
  • चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून शाकंभरी देवीच्या मूर्तीची स्थापना करावी किंवा देवी दुर्गाची प्रतिमा ठेवावी.
  • देवीला लाल रंगांचे वस्त्र अर्पण करून 16 श्रृंगार अर्पण करावा.
  • देवीला विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवतात.
  • दुर्गा सप्तशती, दुर्गा स्तोत्र किंवा संबंधित मंत्रांचा जप करावा.
  • दुर्गा सप्तमीचे पठण करून आरती केली जाते.
  • या दिवशी दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
  • पौर्णिमा ही शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस असतो, जेव्हा व्रताचे पारण करतात.

शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे निसर्ग आणि अन्नदानाची देवी शाकंभरीची उपासना करण्याचा उत्सव आहे, जो आपल्याला प्रकृतीची काळजी घेण्यास आणि जीवनात समृद्धी आणण्यास शिकवतो. ही नवरात्र निसर्ग, वनसंपदा, अन्न आणि शेती यांच्या रक्षणाशी संबंधित आहे. या काळात अन्न-समृद्धी, आरोग्य आणि सुखासाठी प्रार्थना केली जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)