Shani Pradosh Vrat 2026 : शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या…

Published:
शनि प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी निर्जला उपवास ठेवून संध्याकाळी शिवाची पूजा करावी,
Shani Pradosh Vrat 2026 : शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या…
हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते आणि जेव्हा हे व्रत शनिवारी येते, तेव्हा त्याला ‘शनि प्रदोष’ असे म्हणतात. हा दिवस भगवान शिव आणि शनिदेव या दोघांचीही एकत्रित कृपा मिळवण्यासाठी मानला जातो. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ढैय्या सुरू आहे, त्यांच्यासाठी हे व्रत वरदान ठरते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी नक्की काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काय करावे?

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत.
  • मनोभावे उपवासाचा संकल्प करावा. हा उपवास निर्जला (विना पाणी) किंवा फलाहार घेऊन केला जाऊ शकतो.
  • सायंकाळी सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी शिव मंदिरात जाऊन किंवा घरी भगवान शिवाची अभिषेक व पूजा करावी.
  • महादेवाला गंगाजल, दूध आणि विशेषतः काळे तीळ अर्पण करा.
  • महादेवाच्या पूजेसोबतच शनिदेवाची उपासना करा, शनि मंत्राचा जप करा.
  • सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. काळे तीळ आणि निळी फुले अर्पण करणे शुभ असते.
  • गरजू व्यक्तींना काळे तीळ, तेल, काळे कपडे किंवा अन्न दान करावे.
  • ‘शिव चालिसा’ आणि ‘दशरथ कृत शनि स्तोत्राचे’ पठण करावे.
  • दिवसभर उपास करून संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करून उपवास सोडावा.

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काय करू नये?

  • या दिवशी कांदा, लसूण किंवा मांसहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावे.
  • दिवसभर उपवास असल्यास धान्याचे सेवन करू नये.
  • परंपरेनुसार शनिवारी लोखंडी वस्तू, मीठ, मोहरीचे तेल किंवा काळे कपडे खरेदी करून घरी आणणे अशुभ मानले जाते.
  • मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा.
  • वडीलधारी माणसे किंवा गरजूंचा अपमान करू नका, कारण यामुळे शनिदेव कोपित होतात.
  • दिवसभर कोणाशीही वाद घालू नका किंवा रागवू नका. शांतता राखा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews