Marathi News

Astro Tips : पूजेत वापरलेल्या ‘या’ जुन्या गोष्टी चुकूनही पुन्हा वापरू नका, अन्यथा…

Published:
हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वस्तूंना खास महत्त्व असते. फुले, नैवेद्य, अक्षता, धूप-दीप अशा पूजासाहित्यामधून देवाची श्रद्धेने आराधना केली जाते. पूजेत वापरलेले साहित्य पुन्हा वापरणे योग्य की अयोग्य जाणून घ्या....
Astro Tips : पूजेत वापरलेल्या ‘या’ जुन्या गोष्टी चुकूनही पुन्हा वापरू नका, अन्यथा…

वास्तुशास्त्रानुसार देवघर हे तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते, कारण देवघरातून सतत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह घरात वाहत असतो. त्यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुदोष दूर होतात. . वास्तुशास्त्रानुसार पूजेमध्ये अशा काही जुन्या गोष्टी आहेत ज्या कधीही कधीही वापरू नयेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

वापरलेली फुले आणि हार

एकदा देवाला अर्पण केलेली फुले किंवा हार पुन्हा वापरू नयेत, ते विसर्जित करावेत. देवाला अर्पण केलेली फुले आणि हार पुन्हा वापरू नयेत, कारण ते शिळे मानले जातात. ते लगेच काढून झाडात टाकावेत किंवा नदीत विसर्जित करावेत.

पाणी

पूजेसाठी वापरलेले पाणी (अर्घ्य) पुन्हा वापरू नये, ते तुळशीच्या रोपाला किंवा झाडांना घालावे. 

पूजेमधील प्रसाद

पूजेतील उरलेला नैवेद्य किंवा शिळे पदार्थ लगेच काढून टाकावेत, ते पुन्हा वापरू नयेत.  देवाला अर्पण केलेला प्रसाद पुन्हा वापरू नये, तो खावा किंवा इतरांना द्यावा.

चंदन, कुंकू, अक्षता आणि धूप

एकदा पूजेत वापरल्यानंतर त्यांचे पावित्र्य संपते, म्हणून ते पुन्हा वापरू नयेत. एकदा अर्पण केलेले अक्षता पुन्हा वापरू नयेत. एकदा वापरलेली किंवा जळलेली धूप पुन्हा वापरू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कारण यामुळे पावित्र्य कमी होते आणि देवता रुष्ट होऊ शकतात. एकदा अर्पण केलेले चंदन किंवा कुंकू पुन्हा वापरू नये, त्यांचे पावित्र्य संपते.

तेल/तूप

दिव्यासाठी वापरलेले तेल किंवा तूप पुन्हा वापरू नये. पूजेच्या दिव्यामध्ये वापरलेले तेल किंवा तूप पुन्हा वापरणे टाळावे.

अर्पण केलेला नारळ

पूजेत अर्पण केलेला नारळ इतर कोणत्याही पूजेसाठी वापरू नये, तो प्रसाद म्हणून वाटणे योग्य आहे.

पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू

चांदी, पितळ आणि तांब्याची पूजेची भांडी

वास्तुशास्त्रानुसार, पूजेमध्ये चांदी, पितळ आणि तांब्यासारखी भांडी स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात. लोटा, थाळी, वाटी, दिवा यांसारखी भांडी स्वच्छ करून वापरता येतात.

देवाचे वस्त्र

देवाची वस्त्रे धुवून, वाळवून पुन्हा देवाला अर्पण करता येतात, फक्त ती स्वच्छ आणि भक्तीने वापरणे महत्त्वाचे आहे. 

बेलपत्र

शिवपुराणानुसार, बेलपत्र कधीही शिळे होत नाही आणि ते अनेकदा वापरता येते, असे मानले जाते, म्हणून महादेवांना ते प्रिय आहे.

‘या’ नियमांचे पालन का करावे?

  • पूजेतील वस्तू अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि एकदा विधीत वापरल्यानंतर त्यांचे पावित्र्य टिकून राहते.
  • या वस्तूंचा पुनर्वापर टाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो.
  • या नियमांचे पालन न केल्यास नकारात्मक ऊर्जा घरात पसरू शकते आणि व्यक्तीच्या प्रगतीला बाधा येऊ शकते, असे वास्तुशास्त्र सांगते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews