वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या वास्तुदोषांवर उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा आपल्या छोट्या-छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होत असतात. ज्याचा परिणाम हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर कधीही तुमच्या किचनच्या जवळ नसावं, वास्तुशास्त्रामध्ये नेकमं काय सांगितलं आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
किचनजवळ देवघर का नसावं?
वास्तुशास्त्रानुसार, किचन जवळ देवघर नसावे कारण किचनमधील उष्णता आणि हालचाल देवघरातील शांतता व सकारात्मक ऊर्जेला बाधित करते, ज्यामुळे कुटुंबात तणाव, तापटपणा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच देवघराची पवित्रता जपली जात नाही आणि वास्तुदोष निर्माण होतात, म्हणून दोन्ही जागा वेगळ्या असाव्यात.पूजेचे स्थान किचनपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.
अग्नी आणि ऊर्जा
किचनमधील अग्नी (अग्नी तत्त्व) आणि मसाल्यांचा वास देवघरातील शांत आणि पवित्र वातावरणात अडथळा आणतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात नकारात्मकता पसरते, असे मानले जाते.
अस्वच्छता
किचनमधील अस्वच्छता किंवा अन्नाचे अवशेष देवघराच्या पवित्रतेला बाधा आणतात.





