Vastu Tips : राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करेल ‘मीठ’ वाचा योग्य पद्धत…

Published:
काचेच्या भांड्यात मीठ भरून टॉयलेटमध्ये ठेवल्यास राहु-केतूचा नकारात्मक प्रभाव, तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
Vastu Tips : राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करेल ‘मीठ’ वाचा योग्य पद्धत…

मीठामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही, तर ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तु दोष दूर करण्यातही प्रभावी ठरते. स्वयंपाक घरातील मीठ आपल्या वास्तुतील राहु-केतुचे अशुभ परिणाम अगदी सहजपणे दूर करू शकते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

बाथरूममधील उपाय

एका काचेच्या वाटीत खडे मीठ (जाड मीठ) भरून बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि आरोग्य सुधारते. बाथरूम किंवा घरातील कोपऱ्यात ठेवलेले मीठ १५ दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नका, ते ओले झाल्यावर किंवा काळे पडल्यावर बदलून नवीन मीठ ठेवावे. मीठ नेहमी काचेच्या वाटीतच ठेवावे, प्लास्टिकच्या भांड्यात ठेवू नये. मीठ ठेवण्यापूर्वी बाथरूम पूर्णपणे स्वच्छ असावे. 

मीठाच्या पाण्याने पुसणे

दररोज सकाळी घरातील फरशी पुसताना पाण्यात चिमूटभर खडे मीठ टाकल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. फरशी पुसताना बारीक मिठाऐवजी फक्त खडे मीठ वापरावे, कारण त्यात नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता अधिक असते.

राहु-केतूचा प्रभाव

जर घरात सतत तणाव असेल, तर काचेच्या भांड्यात मीठ भरून ते नैऋत्य कोपऱ्यात ठेवल्याने राहु-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो. जर राहु आणि केतुची दशा चालू असेल, तर बर्‍याचदा मनात वाईट विचार उद्भवतात. अशावेळी, एका काचेच्या भांड्यात मीठ भरा आणि एका कोपऱ्यात ठेवा. याचा मोठा परिणाम होईल.

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी नेहमी काचेच्या वाटीत किंवा बरणीत मीठ भरून ठेवा आणि ती वाटी बाथरूम किंवा टॉयलेटच्या कोपऱ्यात ठेवा, यामुळे राहु-केतूचा प्रभाव कमी होतो.

हात-पाय धुणे

रात्री झोपताना किंवा कामावरून परतल्यावर पाण्यात चिमूटभर मीठ टाकून हात-पाय धुतल्याने तणाव दूर होतो आणि राहु-केतूमुळे येणाऱ्या समस्या कमी होतात.

चुकीची पद्धत टाळा

चुकूनही मीठ जमिनीवर सांडू देऊ नका, यामुळे चंद्र आणि शुक्र कमजोर होतात. तसेच, मीठ कधीही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवू नका, ते नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवावे

नजरदोष दूर करणे

कोणाला नजर लागली असल्यास, चिमूटभर मीठ त्यांच्यावरून तीनदा ओवाळून ते पाण्यात किंवा बाहेर फेकून द्यावे.

मीठाबाबत ‘या’ चुका पडतील महागात 

  • मीठ कधीही स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात ठेवू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा वाढते आणि आर्थिक संकट येऊ शकते.
  • जमिनीवर मीठ सांडणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे चंद्र आणि शुक्र कमजोर होतात.
  • कोणाकडूनही मोफत मीठ घेणे टाळावे, यामुळे मानसिक आणि आर्थिक त्रास वाढू शकतो.
  • रात्री झोपण्यापूर्वी घरात मीठ सांडू नये. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)