Vastu Tips : अन्न हे पूर्णब्रह्म! शास्त्रामध्ये सांगितलेत जेवणाचे ‘हे’ महत्त्वाचे नियम…

Published:
या नियमांमुळे घरात सुख-शांती नांदते, धन-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. अन्न वाया घालवल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास घरातील प्रगती खुंटू शकते, असे वास्तुशास्त्र सांगते.
Vastu Tips : अन्न हे पूर्णब्रह्म! शास्त्रामध्ये सांगितलेत जेवणाचे ‘हे’ महत्त्वाचे नियम…

शास्त्रामध्ये जेवणाचे काही नियम सांगितले गेले आहेत. अन्नाला आपल्याकडे पूर्णब्रह्म समजले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अन्नाचा अनादर होऊ नये. याची काळजी घेणे आवश्यक असते. अन्नाबाबत शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

अन्नाचा आदर करा

जेवणाचे ताट वाढल्यावर ‘वदनी कवळ घेता’ म्हणत, अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, शेतकऱ्याचे आणि अन्नपूर्णेचे आभार मानावे. जेवणाचे ताट हे परमेश्वराचे रूप मानले जाते, म्हणून अन्नाचा आदर करणे आवश्यक आहे. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, शेतकरी आणि अन्न शिजवणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानावे, असे शास्त्र सांगते. जेवणापूर्वी आणि जेवताना देवाचे, अन्नपूर्णा मातेचे स्मरण केल्याने अन्नातून सकारात्मक ऊर्जा मिळते.

एकाच जागी शांतपणे बसा

जेवताना एकाच ठिकाणी बसून, लक्ष देऊन आणि शांतपणे खावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्न व्यवस्थित पचते. जेवताना घाई करू नये, मोबाईल किंवा टीव्ही पाहू नये. शांत मनाने आणि कृतज्ञतेने खाल्ल्यास जेवणाची चवही चांगली लागते आणि अन्न शरीरात चांगले शोषले जाते.

जमिनीवर बसून जेव्हा

दारासमोर, पलंगावर किंवा अस्वच्छ ठिकाणी जेवू नका, यामुळे घरात गरिबी, धनहानी आणि नकारात्मक ऊर्जा येते. जमिनीवर पाय दुमडून (सुखासनात) बसणे फायदेशीर, कारण यामुळे पोटाच्या अवयवांवर ताण येत नाही आणि पोटाचे आजार टळतात. पाय पसरवून, पालथी मांडी घालून किंवा पाय वर करून बसणे टाळावे, कारण यामुळे पोटाच्या समस्या होतात. जमिनीवर योग्य दिशेने (पूर्व/उत्तर) सुखासनात बसून जेवल्यास आरोग्य आणि सुख मिळते, तर चुकीच्या ठिकाणी बसल्यास अनेक समस्या निर्माण होतात. कधीही खाटेवर (बेडवर) बसून जेवण करू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

एकाच वेळी ताटात तीन पोळ्या घेऊ नका

एकाच वेळी ताटात तीन पोळ्या वाढू नयेत, कारण विषम संख्या अशुभ मानली जाते. शक्यतो समसंख्येत पोळ्या घ्याव्यात. पूजा किंवा शुभ कार्यांमध्ये ‘तीन’ हा अंक अशुभ मानला जातो, म्हणून जेवताना ताटात तीन पोळ्या एकत्र न घेण्याचा सल्ला दिला जातो.

जेवणाच्या ताटात अन्न सोडू नये

जेवणाच्या ताटात अन्न न सोडणे हे अन्नपूर्णा देवीचा आदर करण्यासारखे आहे. जेवताना ताटात अन्न वाया घालवू नये.

जेवलेल्या ताटात कधीही हात धुवू नका

अनेक जणांना जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते. परंतु वास्तूशास्त्रानुसार, ताटात खरकटा हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा नाराज होते, या गोष्टीचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात. जेवणानंतर ताटातच हात धुणे अशुभ मानले जाते, यामुळे घरात नकारात्मकता येते आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, असेही शास्त्र सांगते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews