Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीला सरस्वती पूजन कसे करावे? जाणून घ्या…

Published:
हिंदू दिनदर्शिकेनुसार वसंत पंचमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी 23 जानेवारीला रोजी वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण शिक्षणाची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे.
Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीला सरस्वती पूजन कसे करावे? जाणून घ्या…

वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. यावर्षी वसंत पंचमी 23 जानेवारीला आहे. हा सण शिक्षणाची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे. लोक पिवळे कपडे घालून आई सरस्वतीची पूजा करतात. या दिवशी देवी सरस्वतीची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण होते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा कशी करावी काय आहे वसंत पंचमीचं महत्व चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात..

वसंत पंचमीचं महत्व

वसंत पंचमी हा दिवस विद्येची देवी सरस्वतीचा जन्मदिन मानला जातो, म्हणून ज्ञान आणि कलेसाठी तिची पूजा केली जाते. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते, जो ऋतूंचा राजा मानला जातो. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि नवीन कामे, विवाह, किंवा नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी हा दिवस निवडला जातो. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते, कारण हा रंग वसंत ऋतूतील पिवळ्या मोहरीच्या फुलांचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण याच दिवशी ते नवीन शिक्षणाची सुरुवात करतात. 

पूजा कशी करावी

  • सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा.
  • पूजेच्या ठिकाणी सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. कलश स्थापना करत असाल तर कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा.
  • देवीला पांढरे आणि पिवळे फूल (विशेषतः पिवळी चाफा किंवा झेंडू), हळद-कुंकू, अक्षता, उदबत्ती, निरांजन, कापूर, आणि आंब्याची पाने अर्पण करा.
  • विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची पुस्तके, वही आणि लेखणी देवीच्या चरणाजवळ ठेवा. हा दिवस नवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करण्यासाठी शुभ असतो.
  • लाह्या, बत्तासे, गूळ, फळे किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ अर्पण करा
  • साखर, दही, केशर मिसळलेली खीर, आणि लवंग यांचा नैवेद्य दाखवा.
  • ‘ॐ सरस्वत्यै नमः’ या मंत्राचा जप करा.
  • नंतर देवाची आरती करून प्रसादाचे वाटप करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)