वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि आनंददायी सण मानला जातो. हा सण माघ महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. यंदा कधी आहे वसंत पंचमी? जाणून घेऊयात…
कधी आहे वसंत पंचमी ?
वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, प्रत्येक तिथीमध्ये एक शुभ मुहूर्त असतो. त्या शुभकाळात देवाची आराधना केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. वसंत पंचमी तिथीला शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून 15 मिनिट ते दुपारी 12 वाजून 15 मिनिटांपर्यंत असेल. या काळात देवी सरस्वतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं, यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
वसंत पंचमीचे महत्त्व
वसंत पंचमी या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वती पांढऱ्या कमळावर पुस्तक, वीणा आणि हार घेऊन विराजमान झाल्या होत्या, म्हणून या दिवशी माता सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. तसेच वसंत पंचमीपासून वसंत ऋतु सुरू होतो. या दिवशी पिवळे कपडे परिधान करणे, पिवळी फुले अर्पण करणे आणि सरस्वतीची पूजा करणे शुभ मानले जाते. शिक्षण, कला आणि बुद्धीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. वसंत पंचमी हा माघ महिन्यातील पंचमीला येणारा, सरस्वती पूजन आणि वसंत ऋतूच्या स्वागताचा दिवस आहे, जो विद्यार्थ्यांसाठी आणि कलाप्रेमींसाठी विशेष महत्त्वाचा असतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






