Vasant Panchami 2026 : वसंत पंचमी का साजरी केली जाते? काय आहे यामागील पौराणिक कथा, वाचा…

Published:
वसंत पंचमी म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचा सण असून, या दिवशी निसर्गातील चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा साजरी केली जाते. शिक्षण संस्था, शाळा आणि महाविद्यालये या दिवशी सरस्वतीची पूजा करतात, कारण ती विद्या, संगीत आणि कलेची देवी आहे.
Vasant Panchami 2026 : वसंत पंचमी का साजरी केली जाते? काय आहे यामागील पौराणिक कथा, वाचा…

वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि आनंददायी सण मानला जातो. हा सण माघ महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. वसंत पंचमी का साजरी केली जाते? काय आहे यामागील पौराणिक कथा चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

वसंत पंचमी पौराणिक कथा

ब्रह्मा आणि सरस्वतीचा जन्म

पौराणिक कथेनुसार, जेव्हा ब्रह्मांनी सृष्टी पाहिली तेव्हा त्यांना सर्वत्र शांतता आणि निःशब्दता जाणवली. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी पृथ्वीवर शिंपडले आणि त्यांच्यातून एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसर्‍या हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव- जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवच्या रूपात देखील साजरी केली जाते.

कालिदासांची कथा

वसंत पंचमीची महाकवी कालिदास यांच्याशी जोडलेली कथाही प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार, कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यावेळी ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करण्यार त्या पूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना केली. आणि तेव्हापासून या दिवशी सरस्वतीची पूजा केली जाते.

श्रीकृष्णाच वरदान

एका कथेनुसार, श्री कृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांच रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती. ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वत:ला राधा प्रती समर्पित असल्याचे सांगितले.  सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्या इच्छेचा आदर राखण्यासाठी, कृष्णाने तिला वरदान दिले की, वसंत पंचमीच्या दिवशी तिची पूजा केली जाईल आणि ती ज्ञान, संगीत व कलेची देवी म्हणून पूजनीय राहील. यानंतर, वसंत पंचमी हा दिवस देवी सरस्वतीच्या पूजेसाठी समर्पित झाला, जिथे विद्यार्थी, कलाकार आणि विद्वान तिची उपासना करतात. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews