Vasant Panchami : वसंत पंचमीला देवी सरस्वतीला अर्पण करा केशर भात, पाहा रेसिपी…

Published:
वसंत पंचमी हा सण विद्येची देवी माता सरस्वती यांना समर्पित आहे, जो यावर्षी 23 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे.
Vasant Panchami : वसंत पंचमीला देवी सरस्वतीला अर्पण करा केशर भात, पाहा रेसिपी…

वसंत पंचमीचा दिवस म्हणजे वसंत ऋतुची सुरुवात त्यामुळे हा सण निसर्गाशी संबंधित मानला जातो. या दिवशी केशर भात तयार केला जातो आणि ह्या भाताचा सरस्वती देवीला नैवेद्य दाखवला जातो. यंदा 23 जानेवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. यंदा या विशेष प्रसंगी तुम्हीही हा केशर भात तयार करू शकता.

साहित्य

  • बासमती तांदूळ
  • साखर
  • तूप
  • केशर: काही काड्या (गरम दुधात भिजवलेल्या) किंवा केशरी रंग
  • सुका मेवा काजू, बदाम, मनुके, सुक्या खोबऱ्याचे काप (आवडीनुसार)
  • वेलची पूड
  • लवंग
  • पाणी

कृती 

  • तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात पाणी आणि तांदूळ एकत्र करून मोकळा शिजवून घ्या, किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवा (पाणी मोजून घ्या).
  • एका जाड बुडाच्या पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात लवंग आणि सुका मेवा (काजू, बदाम) घालून हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • शिजवलेला भात, साखर, केशर भिजवलेले दूध (किंवा रंग), वेलची पूड घालून चांगले मिसळा. साखर विरघळेपर्यंत आणि भात एकजीव होईपर्यंत शिजवा.
  • हा गरमागरम केशर भात देवी सरस्वतीला अर्पण करा. सरस्वती मातेला हा पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करतात. 
  • सरस्वती मातेला पिवळा रंग प्रिय असल्याने हा पदार्थ पिवळ्या रंगाचा केला जातो. हा भात वसंत पंचमीला खास बनवतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)