वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची दिशा आणि स्थिती महत्त्वाची असते, कारण तिचा थेट परिणाम घरातील ऊर्जेवर होतो. घराची डोअर बेल लावताना खालील काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे, जेणेकरून घरामध्ये नकारात्मकता येणार नाही. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
योग्य दिशा
बेलचे बटण नेहमी मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला (बाहेरून पाहता) असावे. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. जर बेलमध्ये मंत्र किंवा ओमचा आवाज असेल, तर ती आग्नेय भिंतीच्या पूर्व दिशेला लावणे सर्वोत्तम आहे.
पक्षांचा किलबिलाट किंवा निसर्गाचे संगीत असलेली बेल वायव्य (North-West) दिशेला लावणे शुभ मानले जाते. या दिशेने हवा घरात येते, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते.
दक्षिण दिशा टाळा
डोअर बेल कधीही दक्षिण दिशेला लावू नका, कारण असे केल्याने अशुभ परिणाम किंवा आर्थिक संकटे ओढवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि मंगळाची दिशा मानली जाते. या दिशेला डोअर बेल लावणे अशुभ ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथून येणारी ऊर्जा ही संघर्षाची किंवा अडथळ्यांची असू शकते.
योग्य उंची
डोअर बेल जमिनीपासून साधारण ५ फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर असावी. यामुळे लहान मुले वारंवार बेल वाजवून घरातील शांतता भंग करू शकणार नाहीत आणि ऊर्जाही संतुलित राहते.
मधुर आवाज
डोअर बेलचा आवाज कर्कश, खूप मोठा किंवा भीतीदायक नसावा. मंत्रोच्चार (उदा. ॐ नमः शिवाय), पक्षांचा किलबिलाट किंवा बासरीचा आवाज असलेल्या बेल्स सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. बेलचा आवाज नेहमी कानाला गोड वाटणारा आणि मनाला शांती देणारा असावा.
प्रकाश आणि स्वच्छता
डोअर बेल नेहमी प्रकाश असलेल्या आणि स्वच्छ ठिकाणी असावी. अंधाऱ्या किंवा घाणेरड्या ठिकाणी बेल लावणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मकता वाढते.
दुरुस्ती
जर डोअर बेल खराब झाली असेल, तर ती तातडीने दुरुस्त करा. तुटलेली किंवा सतत वाजणारी बेल घरातील मानसिक ताण आणि चिडचिड वाढवू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






