Marathi News

Dev Diwali 2025 : देव दिवाळी स्पेशल; भरड्याचे वडे पारंपरिक रेसिपी पाहा

Published:
देव दिवाळी हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला दिवस असतो आणि या दिवशी देवांना नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. भरड्याचे वडे या नैवेद्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
Dev Diwali 2025 : देव दिवाळी स्पेशल; भरड्याचे वडे पारंपरिक रेसिपी पाहा

देव दिवाळीला कोकणात भरड्याचे वडे खास नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात, कारण या काळात देवांना नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. भरड्याचे वडे हे तांदूळ, डाळी आणि इतर धान्यांपासून बनवलेले पारंपरिक पदार्थ आहेत, जे दिवाळीच्या इतर पदार्थांसोबत देवांना दिले जातात. 

साहित्य

  • तांदूळ
  • चणा डाळ
  • मुगडाळ
  • उडीद डाळ
  • धने
  • जिरे
  • मेथी दाणे
  • हळद
  • लाल तिखट
  • हिंग
  • मीठ

भरड्याचे वडे बनवण्यासाठी तांदूळ, चणा डाळ, मुगडाळ, उडीद डाळ, जिरे, धने, मेथी आणि इतर धान्ये वापरली जातात. या मिश्रणाचे मिश्रण बनवून त्याचे वडे बनवून ते तळले जातात, ज्यामुळे ते खुसखुशीत होतात.

कृती

  • तांदूळ, डाळी आणि धान्ये भाजून भरडा तयार करा.
  • भरड्याच्या पिठात गरम तेल, हळद, तिखट, हिंग आणि मीठ घालून पाणी वापरून पीठ मळा. पिठाचे लहान गोळे करून ते प्लास्टिकवर तेलाचा हात लावून हाताने थापा.
  • वडे मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.
  • तयार झालेले भरड्याचे वडे देव दिवाळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून अर्पण करा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews