Dev Diwali 2025 : देव दिवाळीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त काय आणि किती दिवे लावावेत? जाणून घ्या..

Published:
देव दिवाळी ही त्रिपुरारी पौर्णिम म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा दिवस असतो. यादिवशी दिपदानाला महत्त्व आहे. तर घरात दिवे लावले जातात.
Dev Diwali 2025 : देव दिवाळीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त काय आणि किती दिवे लावावेत? जाणून घ्या..

देव दिवाळी 5 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच आज साजरी होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला येणारा हा उत्सव त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. देव दिवाळीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या…

देव दिवाळीला दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा देव दिवाळीचा उत्सव यावर्षी 5 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच आज साजरा होणार आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा सण येतो, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.

देव दीपावलीच्या दिवशी, प्रदोष काळात दिवे लावले जातील. देव दीपावलीच्या प्रदोष काळात दिवे लावण्याचा शुभ काळ संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिट ते 7 वाजून 50 मिनिटांपर्यंत असून त्या दिवशी देव दीपावलीचा शुभ काळ 2 तास 35 मिनिटं असणार आहे. हा मुहूर्त दीपदान करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो.

देव दिवाळीला किती दिवे लावावेत?

देव दिवाळीला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी विषम संख्येचे दिवे जसे की 5, 7, 11, 21, 51 किंवा 101 दिवे लावू शकता. वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांचे फळ मिळावे यासाठी 365 दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews