वास्तुशास्त्रानुसार घराची स्वच्छता केवळ धूळ काढण्यापुरती मर्यादित नसून, ती सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्यासाठीही महत्त्वाची असते. असे मानले जाते की, दररोज लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष प्रभावीपणे दूर होतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात..

नकारात्मक ऊर्जा दूर होते

लादी पुसण्याच्या पाण्यात खडे मीठ टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.  मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने घरातील नकारात्मक स्पंदने नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. घर पुसताना विशेषतः मुख्य प्रवेशद्वाराजवळ मिठाच्या पाण्याने साफसफाई केल्यास बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा उंबरठ्यावरच थांबते.

वास्तुदोष निवारण

रोजच्या फरशी पुसताना मीठ टाकल्याने घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते. वास्तुदोषामुळे अनेकदा घरात विनाकारण तणाव किंवा जडपणा जाणवतो. रोज मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास घरातील कंपने शुद्ध होतात, ज्यामुळे वास्तू प्रसन्न वाटते.

उत्तम आरोग्य

मिठाच्या पाण्यामुळे घरातील जंतू नष्ट होतात आणि घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मीठ हे नैसर्गिक जंतूनाशक असल्याने लादीवरील जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे घरातील आजारपण कमी होण्यास मदत होते. वास्तुदोषामुळे उद्भवणारी वारंवारची आजारपणे कमी होतात आणि घराची आर्थिक प्रगती होण्यास मदत होते.

आर्थिक समस्या दूर होतात

असे मानले जाते की या उपायाने घरातील पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. शनिवारी लादी पुसताना पाण्यात मीठ टाकल्याने वास्तूदोष आणि शनी दोषाचे निवारण होऊन आर्थिक वृद्धी होते. शास्त्रानुसार, मीठ हे समुद्रातून मिळते आणि समुद्राला लक्ष्मीचे उगमस्थान मानले जाते. त्यामुळे मिठाच्या वापरामुळे घरात देवी लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक स्थिरता येते.

राहू आणि शनी दोषांचे निवारण

मिठाचा संबंध राहू आणि शुक्र ग्रहाशी जोडला जातो. मिठाच्या पाण्याने घर स्वच्छ केल्यास राहूचे दोष कमी होतात, ज्यामुळे कामात येणारे अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

घरातील कलह थांबतात

अनेकदा वास्तुदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण चिडचिड किंवा भांडणे होतात. मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यास घरातील मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)