Sankashti Chaturthi Wishes : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या ‘या’ खास शुभेच्छा!

Published:
संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! बाप्पा आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करोत, सुख-समृद्धी आणि सुखद वार्ता घेऊन येवोत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रियजनांना पाठवण्यासाठी काही खास मराठी संदेश
Sankashti Chaturthi Wishes : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या ‘या’ खास शुभेच्छा!

विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. या पवित्र दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येतो, अशी श्रद्धा आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे स्मरण करा आणि प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा…

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा…

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

आज श्रीगणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा..!

कितीही मोठी समस्या असू दे,
विघ्नहर्त्याच्या नावातच समाधान आहे..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर..
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे..
विघ्न दूर करण्यासाठी बळ मिळू दे..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,
आरोग्य आपणांस लाभो;
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्व गणेशभक्तांना,
संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना दूर कर,
दयाळू राहा आणि सर्वांची कामे पूर्ण कर..
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

श्री गणेशाची आराधना केल्याने
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

संकटांवर मात करणारा
गणपती तुम्हाला यश देवो,
तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मोदकाप्रमाणे तुमचे जीवन
गोड आणि चंद्रासारखे तेजस्वी व्हावे
हीच संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने
गणपती चरणी प्रार्थना
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

चंद्रदर्शन आणि बाप्पाचं स्मरण
देईल आपल्याला नवे जीवनाचं कारण
हरू दे चिंता, दूर होवोत त्रास
गणरायाच्या कृपेने मिळो समाधानाचा श्वास
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणराया सर्वांवर कृपा करतो
संकष्ट चतुर्थीचं महत्त्व सांगतो
भक्तीच्या मार्गावर चालू या
विघ्नांचा नाश करू या
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews