घराची सजावट करताना फुलांना प्रचंड महत्त्व आहे, अगदी पूर्वीच्या काळापासून ते आता आधुनिक काळापर्यंत सर्वच जण फुलांचा वापर करतात. आता अनेक जण घराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर करतात. कृत्रिम फुले वापरणे हा एक सोयीस्कर पर्याय आहे. कृत्रिम फुलं ही वर्षानुवर्ष टिकतात.  परंतु अशा फुलांचा वापर करणं योग्य आहे का? वास्तुशास्त्र काय सांगतं? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

काय सांगत वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार कृत्रिम फुलांमुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. कृत्रिम फुले घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतात आणि वास्तुदोष निर्माण करू शकतात, म्हणून शक्यतो ताजी फुले वापरणे चांगले. कृत्रिम फुले घरात मृत, निर्जीव ऊर्जा आणतात, जी सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहासाठी हानिकारक आहे. यामुळे करिअर आणि वैयक्तिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. काहीवेळा यामुळे दुर्दैव येते आणि घरात तणाव वाढतो असे मानले जाते. 

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या सजावटीसाठी कृत्रिम फुले वापरणे टाळावे कारण ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि वास्तुदोष निर्माण करतात, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात. त्याऐवजी, खरी फुले वापरावीत; जर कृत्रिम फुले वापरायची असतील तर ती दक्षिण दिशेला किंवा पायऱ्यांजवळ ठेवू नयेत, कारण यामुळे प्रगतीमध्ये बाधा येते.

कृत्रिम फुले वापरावीत का?

कृत्रिम फुले घरात नकारात्मक ऊर्जा आणू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण आणि आर्थिक समस्या येऊ शकतात, म्हणून त्यांचा वापर जपून करावा. पण, जर तुम्हाला फुले आवडत असतील आणि ताजी फुले आणणे शक्य नसेल, तर चांगल्या प्रतीची, आकर्षक फुले निवडून तुम्ही सजावट करू शकता, फक्त योग्य दिशा आणि रंग निवडा. 

कोणत्या दिशेला ठेवाल ही फुलं?

जर तुम्ही घरामध्ये कृत्रिम फुले ठेवणार असालं तर आशा रोपांची दिशा देखील महत्वाची असते. जर ही रोपे चुकीच्या दिशेला ठेवली तर वास्तू दोष निर्माण होतात. पूर्व आणि पश्चिम या दिशांमध्ये तुम्ही कृत्रिम फुले ठेवू शकता, ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि आनंद वाढतो.

कृत्रिम वनस्पती रोपं स्वच्छ ठेवा

कृत्रिम फुले वापरताना ती नेहमी स्वच्छ ठेवा आणि तुटलेली, सुकलेली फुले लगेच काढून टाका, अन्यथा नकारात्मक ऊर्जा पसरते. 

देवघराच्या सजावटीमध्ये वापरू नयेत

देवघरात कृत्रिम फुले वापरणे वास्तुशास्त्रानुसार टाळावे, कारण त्यांना सुगंध नसतो. वास्तुशास्त्रानुसार देवघरात आणि रोजच्या सजावटीसाठी त्यांचा वापर टाळावा, कारण त्यांना नैसर्गिक सुगंध नसतो, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्न वातावरण निर्माण होत नाही. वास्तुशास्त्रानुसार, घराला आणि देवघराला ताजी, सुगंधित फुले वापरणे शुभ मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)