Sankashti Chaturthi 2025 : मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? जाणून घ्या पुजा विधी आणि महत्त्व

Published:
संकष्टी चतुर्थीचे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यातील या दिवशी भक्त उपवास करतात. संकष्टी चतुर्थी कधी आहे, चंद्रोद्याची वेळ आणि महत्त्व जाणून घ्या..
Sankashti Chaturthi 2025 : मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? जाणून घ्या पुजा विधी आणि महत्त्व

हिंदू धर्मानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरूवात केली जाते, तेव्हा प्रथम भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला येणारी चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित असते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला ‘गणाधिप संकष्टी’ म्हणून साजरी केली जाते.  यंदाची मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थी कधी आहे, चंद्रोद्याची वेळ आणि महत्त्व जाणून घ्या..

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे, जो विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. या दिवशी, भक्त भगवान गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्यासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी, ज्याचा अर्थ ‘संकट दूर करणारी चतुर्थी’ असा आहे, गणेशाला समर्पित आहे. या दिवशी, स्त्रिया विशेषत: आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. 

संकष्टी चतुर्थी तिथी

पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी  7 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी सुरु होईल. या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजून 3 मिनिटांनी होईल. उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत  7 डिसेंबर 2025 रोजी केले जाईल.

चंद्रोदयाची वेळ

दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते आणि अर्घ्य अर्पण केले जाते. रात्री 7 वाजून 55 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे. या दिवशी चंद्रोदयाचे विशेष महत्व असते. जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत व्रत सोडता येत नाही. तसेच चंद्रोदयाच्या वेळेनंतर चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य दिल्यास व्रत पूर्ण मानले जाते अशी मान्यता आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा विधि

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
  • त्यानंतर घरातील पूजागृह किंवा देव्हारा हा गंगाजलाने शुद्ध करावा. तेथे लाल कापड पसरावे.
  • त्यानंतर देव्हाऱ्यात गणरायाची छोटी मूर्ती असल्यास ती स्थापित करावी.
  • यानंतर, हातात पाणी आणि तांदूळ धरून उपवासाची प्रतिज्ञा घ्या.
  • त्यानंतर विधीनुसार गणपतीला अभिषेक करावा.
  • त्याच्यासमोर तुपाचे निरांजन, उदबत्ती लावावी.
  • गणपतीला अक्षता, लाल फूल (जास्वंद), दूर्वा अर्पण कराव्यात.
  • देवासमोर नैवेद्य दाखवा.
  • श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.
  • संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथाही ऐकू शकता.
  • शेवटी, विधीनुसार गणपतीची आरती करा.
  • त्यानंतर, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती करून भोजन करावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews