Mauni Amavasya 2026 : मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या…

Published:
मौनी अमावस्या हा दिवस आत्म-शुद्धी, पितरांना शांती देणे आणि पुण्यकर्म करण्यासाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी शक्य असल्यास मौन पाळून, दानधर्म करून आणि पवित्र आचरण करून पुण्य मिळवावे.
Mauni Amavasya 2026 : मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ? जाणून घ्या…

हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार, या वर्षी मौनी अमावस्या 18 जानेवारी 2026 रोजी आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असतं, ही एक महत्त्वाची अमावस्या मानली जाते. मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊयात…

मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे

  • सूर्योदयाच्या वेळी गंगा-यमुनांसारख्या नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते, यामुळे पाप नष्ट होतात.
  •  तीळ, कुश आणि पाण्याने पितरांना तर्पण करावे, यामुळे पितृदोष दूर होतो.
  • अन्न, कपडे, तीळ, ब्लँकेट अशा वस्तूंचे दान करावे. यामुळे लक्ष्मीची कृपा होते.
  • या दिवशी मौन पाळून जप, तप आणि ध्यान करावे, आध्यात्मिक साधना करावी.
  • पिंपळ वृक्षाची पूजा करणे आणि त्याला पाणी अर्पण करणे लाभदायक असते.
  • माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे, पक्ष्यांना दाणे टाकणे याने समस्या दूर होतात.
  • गूळ आणि तांदळाची खीर खावी, हलके सात्विक भोजन करावे. 

मौनी अमावस्येच्या दिवशी काय करू नये

  • नवीन कपडे, नवीन वस्तू, नवीन वाहन खरेदी करणे किंवा नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे.
  • मनात नकारात्मक विचार आणू नयेत, वादविवाद टाळावे.
  • मौनी अमावस्येच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नये.
  • या दिवशी मांसाहार पूर्णपणे टाळावा.
  • मांस, मासे, कांदा, लसूण खाऊ नये.
  • या दिवशी केस आणि नखे कापणे टाळावे.
  • कुत्रे, गाय, कावळे यांना त्रास देऊ नये.
  • स्मशानभूमी किंवा निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.

मौनी अमावस्येच्या दिवशी काय खरेदी करू नये?

मौनी अमावस्येला नवीन वस्तू, नवीन कपडे, नवीन वाहन खरेदी करणे शुभ मानले जात नाही, कारण हा दिवस आध्यात्मिक शुद्धीकरणाचा असतो आणि नवीन कार्यांसाठी वर्ज्य असतो. . मौनी अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास आर्थिक संकट येऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)