Magh Month Importance : माघ महिन्यात काय करावे ? जाणून घ्या माघ महिन्याच धार्मिक महत्त्व…

Published:
माघ महिन्यात गंगा-यमुना, संगमावर किंवा घरीच पहाटे स्नानास विशेष महत्त्व आहे. या काळात काळे तीळ, गूळ, गरम कपडे, अन्न आणि पिवळे वस्त्र दान करणे शुभ मानले जाते.
Magh Month Importance : माघ महिन्यात काय करावे ? जाणून घ्या माघ महिन्याच धार्मिक महत्त्व…

हिंदू धर्मात माघ महिन्याला खूपच पवित्र मानले जाते. माघ हा शब्द माधव या श्रीकृष्णाच्या रूपाशी संबंधित आहे. या महिन्यात स्नान आणि दानाला महत्त्व आहे. माघ महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

माघ महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार माघ महिना स्नान, दान आणि तपस्येसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान (विशेषतः संगमावर), तीळ व गुळाचे दान, भगवान विष्णूची पूजा आणि दररोज सकाळी लवकर उठणे अत्यंत शुभ असते, ज्यामुळे वर्षभर सुख-समृद्धी, आरोग्य आणि धनलाभ मिळतो.  माघ महिन्यात केलेले स्नान आणि दान यामुळे मागील जन्मातील पाप नष्ट होतात.

माघ महिन्यात काय करावे ? 

  • माघ महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले जाते. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तीळ मिसळून स्नान केल्यास पापांचा नाश होतो.
  • माघ महिन्यात दान करणे सर्वोत्तम आहे. तीळ, गूळ, काळे कपडे, ब्लँकेट, अन्न आणि गरम वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
  • माघ या पवित्र महिन्यात भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि सूर्यदेवाची पूजा करावी. तांब्याच्या भांड्यात पाणी, लाल चंदन आणि फुले टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
  • माघ महिन्यात ‘माधव’ रूपात भगवान विष्णूची पूजा करावी. रोज तुळशीला जल अर्पण करा आणि दिवा लावा.
  • आरोग्य आणि समृद्धीसाठी या महिन्यात तीळ आणि गुळाचा वापर आहारात वाढवावा.
  • माघ महिना हा पवित्र महिना असून, या काळात पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे.

माघ महिन्यात काय करू नये

  • माघ महिन्यात शारीरिक व आध्यात्मिक शुद्धीसाठी तामसिक आहार, मांसाहार, मद्य आणि इतर मादक पदार्थांचे सेवन अजिबात करू नये.
  • उशिरा उठणे किंवा दुपारची झोप घेणे टाळावे, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले जाते.
  • राग, भांडण, अपशब्द किंवा खोटे बोलणे टाळावे.
  • वृद्ध, स्त्रिया, मुले किंवा गरीब व्यक्तींचा अपमान करू नये.
  • या महिन्यात चुकीच्या वस्तूंचे दान टाळावे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews