Mauni Amavasya 2026 : कधी आहे मौनी अमावस्या ? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Published:
माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. या दिवशी स्नान करणे, दान करणे याला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्या कधी आहे ? जाणून घेऊयात...
Mauni Amavasya 2026 : कधी आहे मौनी अमावस्या ? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्येला खूप महत्त्व आहे. या अमावस्येला ‘मौनी अमावस्या’ किंवा ‘माघी अमावस्या’ असे म्हटले जाते. नवीन वर्षातील पहिली अमावस्या नेमकी कधी आहे ? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

मौनी अमावस्या कधी आहे?

पंचांगानुसार नवीन वर्षातील पहिली मौनी अमावस्या ही 17 जानेवारी रोजी रात्री 12 वाजून 04 मिनिटांनी सुरु होईल. आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी रोजी रात्री 1 वाजून 22 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, 18 जानेवारी 2026, रविवार रोजीच मौनी अमावस्या साजरी केली जाईल.

मौनी अमावस्येचे धार्मिक महत्त्व

मौनी अमावस्या  18 जानेवारी 2026 रोजी आहे, जी माघ महिन्यातील अमावस्या असून, या दिवशी गंगा स्नान, मौन व्रत आणि दान केल्याने पुण्य मिळते, पापक्षय होतो आणि पितरांना शांती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये, विशेषतः गंगा नदीत स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते, अशी धारणा आहे. ही तिथी पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने त्यांना सुख-समृद्धी मिळते आणि पितृदोष दूर होतो.

मौनी अमावस्येला दान करण्याचे महत्व

‘मौनी’ हे नाव ‘मनु’ ऋषींच्या नावावरून आले आहे. या दिवशी मौन पाळल्याने मन शांत होते आणि आत्मिक उन्नती होते, अशी धारणा आहे. या दिवशी गुप्तपणे केलेले दान (अन्न, वस्त्र, ब्लँकेट, धन) अधिक शुभ मानले जाते, ज्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. पितृदोषासाठी काळे तीळ दान करणे किंवा तिळाचे पाणी शिवलिंगावर अर्पण करणे लाभदायक असते. गुळ, गहू, लाल वस्त्र, अन्न, पाणी, पादत्राणे यांसारख्या वस्तूंचे दान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)