Gupt Navratri 2026 : कधी सुरु होणार गुप्त नवरात्री ? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

Published:
ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातून चार वेळा नवरात्र येते. माघ आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला 'गुप्त नवरात्री' म्हणतात. या नवरात्रीत देवीची पूजा अत्यंत गुप्तपणे केली जाते.
Gupt Navratri 2026 : कधी सुरु होणार गुप्त नवरात्री ? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जातो. माघ महिन्याची गुप्त नवरात्र लवकरच सुरू होणार आहे. गुप्त नवरात्रीमध्ये भक्त पूर्ण भक्तिभावाने दुर्गा देवीची पूजा करतात. माघ महिन्यातील गुप्त नवरात्र कधी सुरू होईल आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

गुप्त नवरात्री म्हणजे काय?

वर्षातून चार नवरात्री येतात, त्यापैकी दोन ‘गुप्त’ (माघ आणि आषाढ) आणि दोन ‘प्रकट’ (चैत्र आणि अश्विन) असतात. यात देवी दुर्गाच्या १० महाविद्या (काली, तारा, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी, बगलामुखी, धूमावती, मातंगी, कमला, छिन्नमस्ता, भैरवी) यांची पूजा केली जाते.  चैत्र व शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा होते, तर गुप्त नवरात्रीत दहा महाविद्यांची गुप्त साधना केली जाते. या काळात देवी दुर्गेच्या गुप्त रूपांची आणि महाविद्यांची आराधना केली जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. 

गुप्त नवरात्र कधी सुरू होईल

हिंदू कॅलेंडरनुसार, यंदाची गुप्त नवरात्र माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी म्हणजेच 19 जानेवारी 2026 रोजी सुरू होत आहे. घटस्थापनेसाठी 19 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 14 मिनिट ते 10 वाजून 46 मिनिटांपर्यंत आणि दुपारी 12 वाजून 11 मिनिट ते 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे.

कशी साजरी केली जाते

  • गुप्त नवरात्रीमध्ये ‘नऊ दुर्गां’ऐवजी प्रामुख्याने ‘दहा महाविद्या’ यांची पूजा केली जाते. काली, तारा, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, बगलामुखी इत्यादी महाविद्यांची पूजा केली जाते.
  • गुप्त नवरात्री ही पूजा गोपनीय ठेवली जाते. साधक ध्यान, मंत्र जप आणि तंत्राचा अभ्यास करतात.
  • मध्यरात्रीची पूजा या काळात विशेष फलदायी मानली जाते. अंधारात साधना केल्याने ऊर्जा वाढते, असे मानले जाते, म्हणून रात्री पूजा करतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews