वास्तुशास्त्रानुसार, घरात पूर्वजांचे फोटो ठेवणे शुभ मानले जाते, पण त्यांची योग्य जागा निवडणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपल्या पूर्वजांचे फोटो लावताना आपण काही चुका करतो. हे फोटो नेमके कुठे आणि कसे लावावे याबद्दल काही खास नियम आहेत. मात्र कळत-नकळत आपल्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. याबद्दल जाणून घेऊयात…
पूर्वजांचे फोटो लावण्याची योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात चांगली मानली जाते. दक्षिण दिशेला पूर्वजांचे फोटो लावताना त्यांचा चेहरा उत्तर दिशेकडे असावा. दक्षिण दिशा यमदेवाची दिशा मानली जाते. या दिशेला पूर्वजांचे फोटो लावल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. घराच्या मुख्य भिंतीवर किंवा जिथे कुटुंबाचे सदस्य एकत्र बसतात अशा ठिकाणी लावू शकता. हे स्थान पितृस्थान मानले जाते.
फोटो लावण्याचे नियम
- पूर्वजांचे फोटो हॉल किंवा लिव्हिंग रूममध्ये दक्षिण किंवा नैऋत्य भिंतीवर लावावे. हे फोटो घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरेस पडू नयेत.
- पूर्वजांचे फोटो पूजेच्या खोलीत (देवघरात) पूर्वजांचे फोटो बेडरूममध्ये ठेवणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.लावू नयेत, कारण यामुळे देवाच्या पूजेत मन लागत नाही.
- स्वयंपाकघर, बाथरूम, जिन्याखाली किंवा ब्रह्मस्थान (घराचा मध्यभाग) या ठिकाणी फोटो लावू नयेत.
- फोटो फ्रेम केलेला असावा, तुटलेली किंवा खराब झालेली फ्रेम वापरू नये. शक्यतोवर हसऱ्या चेहऱ्याचे आणि आनंदी क्षणांचे फोटो लावावेत.
- फोटो नेहमी चांगल्या आणि आकर्षक फ्रेममध्ये असावेत. फोटो फाटलेले किंवा खराब झालेले नसावेत.
- फोटो अशा ठिकाणी लावा, जिथे सकारात्मक ऊर्जा राहील. यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबाची प्रगती होते.
- एकापेक्षा जास्त पूर्वजांचे फोटो लावू नयेत. एकाच फोटोत सर्व पूर्वज एकत्र असतील तर उत्तम.
- फोटो नेहमी स्वच्छ ठेवावे आणि त्याजागी धूळ किंवा अस्वच्छता नसावी.
- ज्या ठिकाणी जास्त पसारा किंवा अस्वच्छता असेल, अशा ठिकाणी फोटो लावू नये.
- पूर्वजांचे फोटो देवदेवतांच्या मूर्तींच्या वर किंवा खाली लावू नयेत.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





