हिंदू धर्मात भगवान शंकराला सृष्टीचा रक्षणकर्ता मानले जाते. भगवान शिवाचे जगभरात अनेक भक्त आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकराला 8 मुल आहेत. श्री गणेश आणि देवतांचे सेनापती कार्तिकेय यांना महादेवाचे पुत्र म्हणून ओळखतो. बहुतेक लोकांना माहिती नाही पण भगवान महादेव 8 मुलांचे पिता होते. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
गणेश (गणपती)
शिवाची पत्नी पार्वती यांच्यापासून जन्मलेले, बुद्धी आणि शुभ कार्याचे देव. पार्वती मातेने मातीपासून एक मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले.
कार्तिकेय
युद्धाचे आणि सामर्थ्याचे देव. देवांचा सेनापती, शिवाग्नीतून जन्मलेला.
अशोक सुंदरी
पार्वतीच्या अश्रूंमधून जन्माला आलेली कन्या, जी दुःख दूर करते अशी धारणा आहे. अशोक सुंदरी ही पार्वतीच्या एकाकीपणातून जन्मलेली कन्या आहे, जी दुःखाचा नाश करते.
ज्योती
ज्योतीचा जन्म भगवान शंकराच्या तेजातून झाला होता. ज्योतीचा जन्मही पार्वती मातेशी निगडित असून पार्वतीच्या कपाळातून निघणाऱ्या ठिणगीतून ज्योतीचा जन्म झाला असे म्हटले जाते. दक्षिणेकडे तिची पूजा केली जाते.
मनसा देवी
शिवाची मानस कन्या, जी सापांची देवी म्हणून ओळखली जाते आणि तिच्यात विष काढण्याची शक्ती होती. पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथन दरम्यान हलहल विष बाहेर पडले. जगाचे रक्षण करण्यासाठी, भगवान शिव यांनी हे विष आपल्या गळ्यात घातले, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला. त्यानंतर भगवान शिव यांनी त्यांच्या मनातून एका विषकन्याला जन्म दिला, जिने भोलेनाथच्या कंठातील सर्व विष बाहेर काढले. या विषकन्याला मनसा देवी असे म्हटले गेले.
अयप्पा
शिवाने मोहिनीच्या रूपात जन्म घेतलेल्या विष्णूचा अंश मानला जातो. देवतांना अमृत वाटण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले तेव्हा शिव आणि मोहिनी यांचा पुत्र म्हणून अय्यप्पाचा जन्म झाला.
जालंधर
महादेवाला जालंधर नावाचाही पुत्र होता. शिवाने क्रोधाने निर्माण केलेला, जो नंतर असुर बनला आणि शिवानेच त्याचा वध केला.
सुकेश
सुकेशला शिवपुत्र म्हणूनही ओळखले जाते. अनाथ मुलाला शिव-पार्वतीने दत्तक घेतले होते, म्हणून तो शिवपुत्र म्हणून ओळखला जातो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





