लग्नानंतर महिलांच्या पायातील बोटात नेहमी जोडवी घातलेली पाहिली असतील. याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक असे अनेक पैलू आहेत. लग्नाचे प्रतीक मानले जाणारे जोडवी घालण्याचे अनेक कारणे आणि फायदे आहेत. महिलांनी जोडवी का घालावी आणि त्यामुळे काय फायदे होतात ? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
नववधूला का घातली जाते चांदीची जोडवी?
वास्तुशास्त्र आणि परंपरेनुसार, नववधूला चांदीची जोडवी घालणे हे सुखी वैवाहिक जीवन, सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. चांदी हा थंड धातू असल्याने तो शरीरातील उष्णता नियंत्रित करतो, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो आणि मनाला शांती देतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जोडवी हा सोळा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग असून, ती विवाहित असल्याचा पुरावा मानला जाते. चांदीचा संबंध चंद्राशी असल्याने ती मनाला शांत ठेवते आणि नकारात्मकता दूर करते. जोडवी पायाच्या मधल्या बोटात किंवा अंगठ्याजवळील बोटात, विशेषतः लग्नात गौरीहर पूजेच्या वेळी घातली जाते. चांदीच्या स्पर्शामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
१६ शृंगारांपैकी एक असलेला हा दागिना विवाहित स्त्रीच्या पवित्रतेचे आणि वैवाहिक जीवनातील आनंदाचे प्रतीक आहे. चांदी हा चंद्र धातूशी संबंधित मानला जातो. जोडव्याच्या स्पर्शाने शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि मानसिक शांती मिळते. ज्योतिषानुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराशी संबंधित आहे, त्यामुळे ती घालणे शुभ मानले जाते. पायात सोन्याचे दागिने घातले जात नाहीत, कारण सोने विष्णू-लक्ष्मीचे प्रतीक मानून पायात घालणे निषिद्ध आहे. चांदी शरीर थंड ठेवते.
वैज्ञानिक कारण
जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटात घातली जाते. ज्याची नस थेट गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. या दाबामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि प्रजनन क्षमता सुधारते. या बोटावरील दाबामुळे महिलांची संप्रेरक प्रणाली संतुलित राहते आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण नियमित होते, मासिक पाळीच्या समस्या कमी होतात आणि थायरॉईडचा धोका कमी होतो. चांदी थंड धातू असल्याने ते शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






