Astrology : कपाळावर टिळा लावताना डोक्यावर रुमाल का ठेवला जातो? जाणून घ्या यामागील कारण…

Published:
शरीरातील आध्यात्मिक ऊर्जा शरीरात केंद्रित करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, जी कपाळावर टिळा लावताना अत्यंत शुभ मानली जाते. टिळा लावताना डोके झाकणे हे केवळ परंपरा नसून त्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही पैलू आहेत.
Astrology : कपाळावर टिळा लावताना डोक्यावर रुमाल का ठेवला जातो? जाणून घ्या यामागील कारण…

कपाळावर टिळा लावण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी आपण कपाळावर टिळा लावतो. परंतु टिळा लावताना नेमही डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवायला सांगितले जाते, पण का चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

उर्जेचे संरक्षण

शरीरातील मुख्य ऊर्जा केंद्र डोक्याच्या सर्वोच्च भागात असते, ज्याला ‘सहस्रार चक्र’ म्हणतात. टिळा हा दोन्ही भुवयांच्या मध्ये (‘आज्ञा चक्र’) लावला जातो. रुमाल किंवा हात ठेवल्यामुळे हा एक प्रकारे ‘सर्किट’ पूर्ण करतो आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. डोक्यावर रुमाल ठेवल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा बाहेरील वातावरणात न जाता ती पुन्हा शरीरात प्रवाहित होते.

कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये ‘आज्ञाचक्र’ असते, जिथे नसांचे मुख्य स्थान असते. टिळा लावताना त्या बिंदूवर दाब पडल्याने शरीरातील ऊर्जा टिकून राहते, जी रुमालामुळे बाह्य वातावरणात पसरत नाही.

मानसिक स्थिरता

डोक्यावर रुमाल ठेवल्याने मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते. कपाळावर टिळा लावताना डोक्यावर हात किंवा रुमाल ठेवल्याने एक सर्किट पूर्ण होते. यामुळे मेंदूला स्थिरता मिळते आणि मानसिक शांतता व एकाग्रता वाढते. डोके झाकल्याने लक्ष केंद्रित करण्यास मदत होते, ज्यामुळे आध्यात्मिक सकारात्मकता वाढते. जेव्हा डोक्यावर रुमाल किंवा हात ठेवला जातो, तेव्हा लक्ष एकाग्र होते, ज्यामुळे मन शांत होते आणि मानसिक स्थिरता मिळते.

आदर आणि नम्रता

टिळा हा विजय, सन्मान आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. डोके झाकून टिळा लावल्याने आदर आणि आशीर्वाद भावना व्यक्त होते. देव, गुरु किंवा मोठ्या व्यक्तींकडून टिळा लावताना डोके झाकणे हे आदराचे आणि नम्रतेचे लक्षण आहे. हे एक प्रकारे त्यांच्या आशीर्वादाचा स्वीकार दर्शवते.

नकारात्मकता दूर करणे

हिंदू परंपरेत, असे मानले जाते की टिळा लावताना डोके झाकल्याने नकारात्मक ऊर्जा बाधत नाही. कपाळावर टिळा लावताना डोक्यावर रुमाल, टोपी किंवा हात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा किंवा दुष्ट शक्तींचा प्रभाव कमी करते.

टिळा लावण्याचे नियम

  • मन शांत ठेवण्यासाठी रिंग फिंगरने (अनामिका)टिळा लावावा.
  • चांगले आरोग्य आणि यशासाठी अंगठ्याचा वापर करणे चांगले मानले जाते.
  • टिळा लावताना डोके झाकल्याने नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews