शास्त्रात काही देवी-देवता असेही आहेत ज्यांच्या मूर्त्या किंवा फोटो घरात ठेवणे वर्जित मानलं जातं. यापैकीच एक म्हणजे शनिदेव यांची मूर्ती. शनिदेवाची मूर्ती घरात ठेवणे वर्जित आहे. शास्त्रांनुसार शनिदेवाची मूर्ती घराच्या मंदिरात ठेवू नये, यांची पूजा घराच्या बाहेर एखाद्या मंदिरात करावी असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
घरात शनिदेवाची मूर्ती घरात का ठेवू नये?
शनिदेव दंडाधिकारी आहेत. त्यांच्या मूर्तीमुळे घरातील शांतता भंग पावू शकते, त्यामुळे त्यांची पूजा घराबाहेर करणे अधिक फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाची मूर्ती कधीही घरात ठेवू नये. यामागे एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार शनिदेवाला शाप दिला होता की, ते ज्या कोणाला पाहातील त्याचे वाईट होईल. शनिदेवाची दृष्टी थेट घरातील सदस्यांवर पडू नये, म्हणून त्यांची मूर्ती ठेवली जात नाही. ज्यामुळे घरात नकारात्मकता किंवा समस्या वाढू शकतात. जर तुम्ही मंदिरातही शनिदेवाच्या दर्शनासाठी जाल तर त्यांच्या पायाकडे पाहावे त्यांच्या डोळ्यात पाहून दर्शन कधीही करु नये. शनिदेव कर्मफळदाता आहेत, म्हणून त्यांची पूजा मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली करणे योग्य मानले जाते.
हे ही वाचा
शनिदेव व्यतिरिक्त या देवतांच्या मूर्त्या घरात ठेवू नये
शनिदेवाच्या मूर्तीसह काही विशिष्ट देवतांच्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामध्ये मुख्यत्वे शनिदेव, राहु-केतू, आणि देवतांची उग्र रूपे (उदा. महाकाली, भद्रकाली) यांचा समावेश होतो. घरामध्ये शांतता आणि सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी या मूर्ती टाळल्या जातात. हिंसक किंवा युद्धरूपातील देवतांच्या मूर्ती घरात ठेवू नयेत, यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होऊ शकते.
शनिदेव, राहू-केतू, नटराज आणि भैरव यांसारख्या रौद्र किंवा अत्यंत प्रभावशाली देवतांच्या मूर्ती घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आणि कुटुंबात कलह वाढू शकतो. नटराज मूर्ती हे शिवतांडवाचे, म्हणजेच शिवाची विनाशकारी मुद्रा (रौद्र रूप) आहे. यामुळे घरातील सदस्यांचा स्वभाव क्रोधी होऊ शकतो आणि अशांतता निर्माण होते. भैरव हे महादेवाचे अवतार असले तरी, ते तांत्रिक देवता मानले जातात. त्यामुळे त्यांची पूजा घराबाहेर करणे अधिक सुरक्षित मानले जाते. राहु-केतूची मूर्ती किंवा छायाचित्रे घरात ठेवल्याने आर्थिक अडथळे आणि अनपेक्षित संकटे येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)